Rabbi Production News esakal
जळगाव

Jalgaon News : शेतकऱ्यांसाठी रब्बी उत्पादन वाढवा स्‍पर्धा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकरी विविध भागांमध्ये प्रयोग करतात. यामुळे उत्पादकतेत वाढ होते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्‍ती, मनोबलमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

यामुळे कृषी उत्पादनात भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. ही स्‍पर्धा तालुका, जिल्‍हा व राज्य पातळीवर राबविण्‍यात येणार आहे. (Competition for Farmers to Increase Rabi Production Prizes of 5 to 10 thousand for taluka district level winners Jalgaon News)

पीक स्पर्धेतील पिके : रब्बी पिके- ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस (एकूण ५ पिके) असतील. पिकांची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान एक हजार हेक्टर असावे. संबंधित पिकाखालील क्षेत्र एक हजार हेक्टरपेक्षा कमी असल्यास व स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

स्पर्धक संख्या, पीक स्पर्धा क्षेत्र, कापणी प्रयोग घ्यावयाची संख्या- स्पर्धेत सहभागी लाभार्थीचे स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली भात पिकासाठी किमान २० आर. व इतर पिकांसाठी ४० आर. क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

रब्‍बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख ३१ डिसेंबर आहे. तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरील पीक स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते निवडण्यात येतील. या पद्धतीने पीक स्पर्धा घ्यावयाची हे प्रथम वर्ष असल्याने प्रथम फक्त तालुका व जिल्‍हा स्‍तरीय पीक स्पर्धा घेण्यात येईल. राज्‍य पातळीवरील पीक स्‍पर्धा या वर्षी होणार नाहीत. गेल्या वर्षाच्‍या तालुकास्‍तरीय स्‍पर्धेतील पीकनिहाय पहिल्‍या तीन क्रमांकाच्‍या विजेत्‍या शेतकऱ्यांनी जिल्‍हास्‍तरीय पीक स्‍पर्धेमध्‍ये सहभाग घ्‍यावा.

सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षीस

तालुका पातळीवर पहिले बक्षीस पाच हजार रुपये, दुसरे तीन हजार रुपये, तिसरे दोन हजार रुपये, जिल्हा पातळीवर पहिले दहा हजार रुपये, दुसरे सात हजार रुपये, तिसरे पाच हजार रुपये, राज्य पातळीवर पहिले ५० हजार रुपये, दुसरे ४० हजार रुपये, तिसरे बक्षीस तीस हजार रुपये देण्यात येणार आहे.

"रब्बी हंगाम, दुय्यम व पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे, ही बाब विचारात घेऊन पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्‍हावे."

-संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT