complaint filed for defaming guardian minister on Facebook Jalgaon Cyber Crime esakal
जळगाव

Jalgaon Cyber Crime : फेसबुकवरून केली पालकमंत्र्यांची बदनामी; एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Cyber Crime : जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या बद्दल अज्ञात व्यक्तीने फेसबुक वरून आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी केल्याचा प्रकारसमोर आला आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (complaint filed for defaming guardian minister on Facebook Jalgaon Cyber Crime)

एका अज्ञात सायबर गुन्हेगाराने फेसबुकवर शिवसेना जळगाव ग्रामीण नावाचे पेज तयार करून (ता.७ ते २५ जुलै) दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल वेळोवेळी आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी केल्याचे समोर आले.

संबंधित व्यक्तीने फेसबुक पेजवर कोणतीही खात्री न करता वेगवेगळ्या पोस्ट टाकून बदनामी करून त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान समाज सेवक गणेश सोनवणे यांनी बुधवारी (ता.२६) एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: पुण्यात भयंकर प्रकार, भरदिवसा बंदूक नाचवत तरुणांचा राडा; पाहा व्हिडिओ

Cash Seized: निवडणुकीच्या धामधुमीत पावणेदोन कोटींवर मुद्देमाल जप्त; 80 लाखांचे अमली पदार्थ तर 27 लाखांच्या दारूचा समावेश

IND vs NZ: जसप्रीत बुमराहला मुंबई कसोटीतून का बाहेर केलं? BCCI ने सांगितलं खरं कारण

तब्बल ५ वर्षांनी स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका घेणार निरोप; अभिनेत्यानेच पोस्ट करत सांगितलं, म्हणाला- आता लवकरच...

Vidhansabha Nivadnuk 2024: काका-पुतणे झाले, आता महाराष्ट्र पाहणार मामा-भाच्याची लढत; कुठे रंगणार सामना? कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT