चोपडा (जि. जळगाव) : येथील शिवरंजनी संगीत विद्यालयाच्या शाखा उद्घाटनानिमित्त व नूतन मराठी वर्षारंभाच्या मुहूर्तावर महाराष्ट्र साहित्य परिषद व शिवरंजनी संगीत विद्यालयाच्या विद्यमाने ‘सांज पाडवा’ हा सुश्राव्य गीतांच्या मैफलीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या विविध गाण्यांमुळे मैफल चांगलीच रंगली होती. (concert of Sanj Padwa was held in Chopda jalgaon news)
येथील पंकज विद्यालयात आयोजित या संगीत मैफलीत दूरदर्शनवरील ‘ताक धी ना धिन’ या संगीत स्पर्धेच्या प्रथम फेरीचे विजेता सुप्रसिद्ध गायक नागेश खोडवे (छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह चोपडा येथील शिवरंजनी संगीत विद्यालयाचे मनोज चित्रकथी यांनी मराठी भजने, गीते, भावगीते, नाट्यगीते, गज़ल आदींचा सुश्राव्य स्वराविष्कार सादर केला. ‘येई ओ विठ्ठले...’ या भजनाने नागेश खोडवे यांनी या मैफलीला सुरवात केली.
‘कृपा करा माई’, ‘रंध्रात पेरली मी’ या भजनांसह ‘येथुनी आनंदु रे’, ‘बगळ्यांची माळ फुले’ ही भावगीते व ‘काटा रुते कुणाला’ हे नाट्यगीत त्यांनी सुरेल आवाजात सादर केले. त्यांनी सादर केलेल्या ‘कधी तो चंद्रही माझ्या घराशी’, ‘वेगवेगळी फुले उमलली’, ‘चंद्र आता मावळाया लागला’, ‘जगणे कळाया लागले आता’, ‘अंदाज आरशाचा वाटे खरा असावा’ या गजल उपस्थित रसिक श्रोत्यांना चांगल्या भावल्या.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
या मैफलीत मनोज चित्रकथी यांनी ‘नाही पुण्याची मोजणी’, ‘स्वयें श्री राम प्रभू ऐकती’ या भजनांसह ‘मान वेळावूनी धुंद होऊ नको’, ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ ही भावगीते सादर करुन रसिकांची मने जिंकली. नागेश खोडवे यांनी ‘उघड्या पुन्हा जाहल्या जखमा’ या भैरवीने मैफलीची सांगता केली. या मैफलीत योगेश संदानशीव (अमळनेर) व नरेंद्र भावे (चोपडा) यांनी तबल्यावर तसेच योगेश चौधरी यांनी साथसंगत केली.
आकाशवाणी कलावंत गिरीश चौक (अमळनेर) यांनी निवेदन केले. सुरवातीला शाखेचे उपाध्यक्ष राजेंद्र महाजन, कार्याध्यक्ष विलास पाटील, कार्यवाह संजय बारी, विश्वस्त मंडळाचे कार्यवाह श्रीकांत नेवे, डॉ. विकास हरताळकर, पंकज बोरोले यांच्यासह मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून मैफलीचे उद्घाटन केले. योगेश चौधरी यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले. संगीत मैफलीला मोठ्या संख्येने रसिक श्रोत्यांनी उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.