stamp duty sakal
जळगाव

Jalgaon News : ग्राहकांना मिळणार मुद्रांक शुल्कासह दंडात सवलत; 31 मार्च 2024 पर्यंत मुदत

राज्य सरकारने महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३ जाहीर केली. ग्राहकांना मुद्रांक शुल्क व दंडामध्ये सवलत अथवा माफी मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राज्य सरकारने महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३ जाहीर केली. ग्राहकांना मुद्रांक शुल्क व दंडामध्ये सवलत अथवा माफी मिळणार आहे.

कमी मुद्रांकावरील नोंदणीस दाखल केलेल्या अथवा न केलेल्या ३१ डिसेंबर २०२० ला अथवा त्यापूर्वी निष्पादित केलेल्या दस्तऐवजाचे मुद्रांक शुल्क भरून घेण्यासाठी राज्य सरकारने ही योजना एक डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीसाठी दोन टप्प्यात आणली आहे.(Concession on fines including stamp duty will be available to customers jalgaon news)

पहिल्या टप्प्यात एक डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत अर्ज सादर केल्यास एक रुपया ते एक लाख इतक्या फरकाच्या रकमेसाठी मुद्रांक शुल्क व दंडामध्ये शंभर टक्के माफी आणि एक लाखांपेक्षा अधिक मुद्रांक शुल्कावर पन्नास टक्के माफी आणि दंड शंभर टक्के माफ केला जाणार आहे.

दुसरा टप्पा एक फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२४ या कालावधीसाठी असून ग्राहकाला एक रुपया ते एक लाख इतक्या फरकाच्या रकमेसाठी मुद्रांक शुल्कात ८० टक्के आणि दंडामध्ये ८० टक्के माफी तसेच एक लाखांपेक्षा अधिक मुद्रांक शुल्कात चाळीस टक्के आणि दंडात ७० टक्के माफी मिळणार आहे.

याशिवाय एक जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत निष्पादित झालेल्या दस्तऐवजांच्या संबंधी पहिल्या टप्यांत ग्राहकाला एक डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालवधीत अर्ज सादर करायचा आहे.

या अंतर्गत एक रुपया ते पंचवीस लाख इतक्या फरकाच्या रकमेसाठी मुद्रांक शुल्कात पंचवीस टक्के आणि दंडाची रक्कम पंचवीस लाखांपेक्षा कमी असल्यास ९० टक्के माफी व दंडाची रक्कम पंचवीस लाखांपेक्षा अधिक असल्यास पंचवीस लाख रुपये भरायचे असून त्यापुढील रकमेवर सवलत आहे. पंचवीस कोटींपेक्षा अधिक असलेल्या मुद्रांक शुल्क फरकाच्या रकमेसाठी मुद्रांक शुल्कामध्ये वीस टक्के सवलत आणि दंडामध्ये एक कोटी रुपये भरायचे असून त्यापुढील रकमेसाठी सवलत आहे.

दुसऱ्या टप्यांत ग्राहकाने एक डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत अर्ज सादर केल्यास एक रुपया ते पंचवीस कोटी इतक्या फरकाच्या रकमेसाठी मुद्रांक शुल्क वीस टक्के सवलत व दंडाची रक्कम पन्नास लाखांपेक्षा कमी असल्यास ८० टक्के माफी आणि दंडाची रक्कम पंचवीस लाखांपेक्षा जास्त असल्यास पन्नास लाख रुपये भरणा करायचा असून त्यापुढील रकमेवर सवलत आहे.

''योजनेत पंचवीस कोटींपेक्षा अधिक असलेल्या मुद्रांक शुल्क फरकाच्या रकमेसाठी मुद्रांक शुल्कामध्ये दहा टक्के सवलत आणि अधिक दोन कोटी दंड भरावा लागेल. त्यापुढील रकमेवर सवलत आहे. सवलत अथवा माफी मिळण्यासाठी पक्षकार, त्यांचे वारस अथवा मुखत्यारपत्रधारकांस अर्ज करता येईल. त्यांनी मूळ दस्तऐवजांसह मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा सह दुय्यम निबंधक यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.''- सुनील पाटील, जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT