Jalgaon Road Construction : जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. शासनाकडून निधी मंजूर करूनही कामे लवकर होत नसल्यामुळे जनतेत नाराजी आहे. परंतु आता शंभर कोटीतील २६५ व ८५ कोटीतील सात मोठ्या रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरण कामांची आठवडाभरात सुरवात होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आली.
शहरातील रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण रस्त्याची दुरूस्ती होण्याची प्रतिक्षा जळगावकर करीत आहेत. अगदी गल्लीबोळातील रस्तेही खराब झाले आहेत. या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. (Concreting of roads in Jalgaon soon news)
गल्लीबोळातील रस्त्यांसाठी शंभर कोटी, तर प्रमुख रस्त्यांसाठी ८५ कोटी रूपये मंजूर झाले आहेत. त्या निधीतून काम करण्याबाबत महापालिकेच्या महासभेत मंजूरीही देण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे त्याची प्रक्रिया होत नसल्यामुळे नागरिकामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेतही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापौरांतर्फे अधिकाऱ्यांची बैठक
शहरातील रस्त्यांची कामे लवकर करण्यात यावीत, यासाठी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. त्या बैठकितही कामाचा आढावा त्यांनी घेतला होता.
निधीतील रस्त्यांची लवकरच कामे
रस्त्याच्या कामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि, शंभर कोटीच्या निधीतून शहरातील २६५ रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. त्यापैकी १०४ रस्त्यांच्या निवीदा काढण्यात आल्या असून, त्या मंजूरीसाठी वरीष्ठ स्तरावर पाठविण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तसेच, उर्वरीत १६१कामांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या असून, त्या निगोसिएशनसाठी पाठविण्यात आल्या आहेत. त्यालाही लवकरच मंजूरी मिळणार आहे. याशिवाय ८५ कोटी रूपयांच्या निधीतून सात मोठे रस्ते करण्यात येणार आहेत.
निमखेडी ते सुरत रेल्वे गेट व पुढे दूध फेडरेशनकडून छत्रपती शिवाजीनगर पूलापर्यंत, नुक्कड कार्नर ते थेट मोहाडीपर्यंत, जिल्हा परिषद ते थेट अजिंठा चौफुलीपर्यंत, टॉवर चौक ते जैनाबादपर्यंतच्या रस्त्याचे काम होणार आहे. या सातही रस्त्यांच्या निवीदा मंजूर करण्यात आल्या आहेत. मक्तेदारांना कामाचे आदेशही देण्यात आले असून, दोन ते तीन दिवसात काम सुरू होईल. तर शंभर कोटीतील रस्त्याचे काम आठवडाभरात सुरू होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
"शंभर कोटीच्या निधीतील रस्त्याच्या कामांच्या निवीदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. त्या मंजूरीसाठी पाठविल्या असून, आठवडाभरात त्याचे काम सुरू होईल. ८५ कोटीच्या निवीदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, मक्तेदाराला आदेश देण्यात आले आहेत. त्याचे काम आठवडाभरात पूर्ण करण्यात येईल." -गिरीश सूर्यवंशी, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.