Anandacha Shidha esakal
जळगाव

Anandacha Shidha : 8 दिवसांवर गुढीपाडवा; आनंदाचा शिधा’ची रेशन कार्डधारकांना प्रतिक्षा!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यातील शिंदे-फडणवीस शासनाने गुढीपाडवा सणासाठी रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा (रवा, साखर, तेल, चनादाळ) (Anandacha Shidha) शंभर रुपयांत देण्याचे ठरविले आहे.

अवघ्या आठ दिवसांवर गुढीपाडवा येऊन ठेपला आहे. (Confusion among ration card holders common man would get anandacha shidha before Gudi Padwa jalgaon news)

सर्वसामान्यांना गुढीपाडव्यापूर्वी आनंदाचा शिधा मिळेल किंवा नाही, याबाबत रेशन कार्डधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. गरीबांना मराठी नवीन वर्षाला महागाईची झळ नको, म्हणून राज्य शासनाने १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ गुढीपाडवा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देण्याची घोषणा मंत्रिमंडळाने केली होती.

राज्यातील एक कोटी ६३ लाख शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे. गेल्या दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ देण्यात आला होता. काहींना दिवाळीत, तर काहींना दिवाळीनंतर ‘आनंदाचा शिधा’ मिळाला होता. ‘आनंदाचा शिधा’ पाकिटावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे छायाचित्र नव्हते. यामुळे ती पाकिटे परत मागविली होती, तर काही ठिकाणी साखर, तेल न मिळताच शिधावाटप झाला होता. यामुळे ‘आनंदाचा शिधा’ चांगलाच गाजला होता.

आता परत ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने रेशन कार्डधारकांमध्ये समाधान व्यक्त झाले होते. अवघ्या आठ दिवसांवर गुढीपाडवा आहे. सणापूर्वी रेशन कार्डधारकांना शिधा देणे आवश्‍यक आहे. मात्र, पुरवठा विभागाकडे अद्यापपर्यत राज्य शासनाकडून ‘आनंदाचा शिधा’चे संच उपलब्ध झालेले नाहीत.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

ते आल्यानंतर प्रत्येक रेशन दुकानदारास कार्डच्या संख्येच्या प्रमाणात पोचविण्यात येतील. मात्र, अद्यापही संच पुरवठा विभागाला उपलब्ध झालेला नाही. तो संच केव्हा उपलब्ध होईल? केव्हा रेशन दुकानांवर पोचल व गुढीपाडव्यापूर्वी रेशन कार्डधारकांना मिळेल किंवा नाही, याबाबत शंकाकुशंकांना ऊत आला आहे.

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार प्राधान्य गटात चार लाख ९० हजार ६४०, अंत्योदय गटात एक लाख ३४ हजार ३५७ कार्डधारक, अशा एकूण सहा लाख २४ हजार ९९७ कार्डधारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे.

"शासनाच्या निर्णयानुसार येत्या गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्ह्यात सहा लाखांवर कार्डधारकांना आनंदाचा शिधा प्रत्येकी १०० रुपयांत वाटप होणार आहे. संच अद्याप आलेले नाहीत." -सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT