जळगाव

Jalgaon Politics News : काँग्रेसची संविधान वाचविण्यासाठी लढाई : पीरनकुमार अनुष्ठान

सकाळ वृत्तसेवा

पारोळा (जि. जळगाव) : वाढती महागाई, वाढलेली बेरोजगारी, शेतकरी व सर्वसामान्यांचे होणारे हाल याचा विचार केंद्र सरकारने न करता सूडबुद्धीने, संसदीय प्रणालीला फाटा देऊन हुकूमशाही पद्धतीने राहुल गांधींवर केलेली कारवाई लोकशाहीला मारक आहे, असा आरोप काँग्रेस तालुकाध्यक्ष पीरनकुमार अनुष्ठान यांनी पत्रकार परिषदेत केला.

कॉंग्रेस लोकशाही, संविधान व देश वाचविण्याची ही लढाई जनतेच्या दरबारात लढेल व निश्चितपणे विजय होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. (Congress taluka president piranKumar anushthan statement about Congress Battle to Save Constitution jalgaon news)

या वेळी प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन, ज्येष्ठ सदस्य नामदेव महाजन व पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत श्री. अनुष्ठान म्हणाले, की अदानी व अंबानीचे कर्ज माफ केले जाते. मात्र शेतकऱ्यांना मोर्चा काढून कर्जमाफीची मागणी करावी लागते, ही शोकांतिका आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूला पडून

केंद्रातील भाजप व मोदी सरकार लोकांची दिशाभूल करीत आहे. जाहिरात बाजी करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू असून, जो आवाज उठवेल त्याच्याविरुद्ध ईडी, सीडी लावून खोटे गुन्हे दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. राहुल गांधींना किरकोळ शिक्षेवरून खासदारकी रद्द करण्याचा घाट केंद्रातील सरकारने रचला ही घटना लोकशाही प्रणालीत काळीमा फासणारी घटना आहे.

राहुल गांधी यांची भारतजोडो यात्रा यशस्वी झाल्याने केंद्र सरकारची पोटदुखी वाढल्यामुळे त्यांनी हुकूमशाहीचा वापर केला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

शेतकऱ्याला कर्जमुक्तीसाठी मोर्चा : महाजन

देशात अदानी व अंबानीने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. याबाबत कोणतीही कारवाई न होता त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. राज्यातील व केंद्रातील सरकारकडे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना मोर्चा काढावा लागतो. ही देशाची शोकांतिका आहे. केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध राहुल गांधी हे जनसामान्यात त्यांची बाजू मांडत आहेत.

तसेच येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मोदी सरकारला जाब विचारेल, परिणामी जनता देखील त्याबाबत आपली भूमिका मतपेटीतून मांडेल. ही भीती केंद्रातील मोदी सरकारला आहे.राज्यातील सरकारने राजस्थान पॅटर्न वापरून महिलांना मोफत प्रवास देण्यापेक्षा गॅस सिलिंडर दरात कपात केली असती तर सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले असते, असे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन यांनी सांगितले. शेवटी तालुकाध्यक्ष पीरणकुमार अनुष्ठान यांनी काँग्रेसची भूमिका मांडत जनतेच्या हितासाठी काँग्रेसची लढाई सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT