Eyes Infection esakal
जळगाव

Jalgaon Eye Infection : डोळ्यांच्या संसर्गजन्य रोगाचे रुग्ण वाढले; अशी घ्या काळजी...

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Eye Infection : जिल्ह्यात कंजक्टिव्हायटीस हा डोळ्यांचा संसर्गजन्य रोग बळावला आहे. आरोग्य अधिकारी आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा सेविकांच्या मदतीने घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे.

याबाबत नागरिकांनी जागरूक राहावे व स्वतःच्या डोळ्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी केले आहे. (Conjunctivitis patients increased in district jalgaon news)

कंजक्टिव्हायटीस हा विषाणूजन्य संसर्ग रोग आहे. डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग हा मुख्यत्वे ॲडिनो व्हायरसमुळे होतो. जो विशेषतः पावसाळ्यात होतो. कधी कधी दोन्ही डोळ्यांवर त्याचा संसर्ग होतो. डोळे येणे हा सौम्य प्रकारचा विषाणूजन्य संसर्ग असला तरीदेखील याबाबत सर्व विभागाने दक्ष राहाणे आणि जनतेने आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.

ही आहेत लक्षणे...

डोळ्यांतून पाणी येणे, खाज येणे, चिकटपणा येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लालसर होणे, डोळ्यांतून पिवळा द्रव येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

...अशी घ्या काळजी

डोळे स्वच्छ पाण्याने सतत धुवावे, रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादी स्वतंत्र ठेवावेत. इतर व्यक्तीच्या रुमाल वा टॉवलने डोळे पुसू नयेत. डोळ्यांना सतत स्पर्श करू नये. उन्हात वापरण्यासाठी असणाऱ्या चष्म्याचा वापर करावा. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळ्यांची साथ पसरवितात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

डॉक्टरांच्या सल्यानुसारच औषध डोळ्यांत टाकावीत. डोळ्यांतून पाणी गळणे, सूज येणे अशी लक्षण आढळतात अशा व्यक्तींनी आपला जनसंपर्क कमी करणे, तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे. एकापासून दुसऱ्या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो, त्यामुळे नियमित हात धुणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.

...या सुरू आहेत उपाययोजना

वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत बाह्य रुग्ण स्तरावर रुग्णाची तपासणी व उपचार, समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा सेविकांच्या मदतीने घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे.

आवश्यकता असल्यास रुग्णांना संदर्भ सेवा देण्यात येते. शाळा, अंगणवाडी, हायस्कूल, वसतिगृह ठिकाणी भेटी देऊन मुलांची तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य शिक्षण व जनजागृती सुरू आहे. आरबीएसके पथकामार्फत शाळांमध्ये दैनंदिन रुग्ण तपासणी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT