KBCNMU News : विद्यापीठाने केलेल्या जनजागृतीचा परिणाम दिसत असून यावर्षी परीक्षांमधील कॉप्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट दिसून येत आहे, असा दावा कुलगुरू व प्र- कुलगुरूंच्या पथकांनी विविध केंद्रांना भेट दिल्यानंतर केला आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा केंद्रांना कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे आणि कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी स्वतंत्रपणे भेटी देवून परीक्षांचा आढावा घेतला.(Control of Copy in University Examinations by Vice Chancellor and Pro Vice Chancellor KBCNMU news jalgaon )
विद्यापीठाच्या ऑक्टोबर/नोव्हेंबरच्या परीक्षा दिवाळीच्या आधी सुरु झाल्या आहेत. विद्यापीठाने यावर्षी तणावमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा घेतल्या जाव्यात यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून जाणीवपूर्वक प्रयत्न करून जनजागृती केली. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर (हॉलतिकीट) कॉपी केल्यास कोणत्या प्रकारची शिक्षा होवू शकते याची माहिती दिल्यामुळे या सत्रात कॉपी करण्याचे प्रमाण घटले आहे.
कुलगुरूंनी दिली याठिकाणी भेट
कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी बुधवारी जामनेर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील खडसे महाविद्यालयात सुरु असलेल्या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. या वेळी त्यांच्या समवेत व्य.प. सदस्य राजेंद्र नन्नवरे होते. गुरुवारी साक्री येथी सी.गो. पाटील महाविद्यालयाला देखील कुलगुरूंनी भेट दिली.
विद्यापीठाने झालेल्या परीक्षांचे तातडीने ऑनलाइन मूल्यांकन सुरु केले असून कुलगुरूंनी भेटी दिलेल्या महाविद्यालयात मूल्यांकन केंद्रालाही भेट देवून माहिती घेतली. सर्व प्राध्यापकांनी या मूल्यांकन प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी केले आहे.
प्र- कुलगुरुही फिल्डवर
प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे एरंडोल येथील डी.एस. पाटील महाविद्यालय, धुळे येथील झेड बी. पाटील महाविद्यालय, एसएसव्हीपीएस महाविद्यालय आणि पालेशा महाविद्यालयाला भेटी देवून परीक्षांचा आढावा घेतला.
कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षणमंडळाचे महाविद्यालय, पंकज कला महाविद्यालय व सामाजिक कार्य महाविद्यालय, शिरपूर येथील एस.पी.डी.एम. महाविद्यालय, आर.सी. पटेल महाविद्यालय, एच.आर.पटेल महिला महाविद्यालय तसेच नरडाणा येथील ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे महाविद्यालय व थाळनेर येथील महाविद्यालयात सुरु असलेल्या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.