control room was established at district level for immediate resolution of farmers problems jalgaon news farm
जळगाव

Jalgoan Agriculture News : बियाणे, खतांबाबत अडचणी सोडविण्यासाठी नियंत्रण कक्ष; येथे करा तक्रार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ सुरू झाला असून, यात बी-बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व विक्रेते यांच्या क्षेत्रीय स्तरावरील अडचणी व तक्रारींचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे. (control room was established at district level for immediate resolution of farmers problems jalgaon news)

कृषी निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी, त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे. याबाबत येणाऱ्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली.

या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी ८९८३८३९४६८, कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२३९०५४,

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० या क्रमांकावर संपर्क करता येईल. सोबतच अडचण किंवा तक्रार saojalgaon@gmail.com वरही ई मेलद्वारे पाठविता येणार आहे.

जिल्हा स्तरावर बियाणे, खते व किटकनाशकांची गुणवत्ता व पुरवठ्यासंबंधी तक्रार निवारण कक्षात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे ८९८३८३९४६८, वरिष्ठ लिपीक संतोष भावसार ९८३८३९४६८, कृषी सहाय्यक समाधान देवरे ८९८३८३९४६८ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT