अमळनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहर आता दर सोमवारी बंद राहणार आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आज सकाळी अकराला प्रशासन व व्यापाऱ्यांच्या बैठकीत याबाबत एक मताने निर्णय घेण्यात आला असून, पूर्वी ठरविण्यात आलेला शनिवार रद्द करण्यात आला आहे.
प्रांताधिकारी सीमा अहिरे, उपमुख्यधिकारी संदीप गायकवाड, प्रशासन अधिकारि संजय चौधरी व्यासपीठावर होते. यावेळी सुमारे 50 व्यापारी बैठकीस उपस्थित होते. प्रांताधिकारी श्रीमती अहिरे यांनी व्यापाऱ्यांना आता सोमवारी कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. व्यापाऱ्यांनीही एकमुखी निर्णय घेऊन कडक अमलबाजवणी करू असे आश्वासन दिले.
शनिवार ऐवजी सोमवार बंद
काही दिवसांपूर्वी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत शनिवारी बंदचा निर्णय झाला होता. मात्र, सोमवारी अमळनेरचा आठवडे बाजार भरतो. त्यामुळे शनिवार ऐवजी सोमवारीच पूर्णपणे बंद पाळावा असा सूर उमटत असल्याने आज शनिवार रद्द करुन सोमवारी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत संजय चौधरी यांनीही मार्गदर्शन केले.
दंडात्मक कारवाई टाळावी
सोमवारी कडकडीत बंद पाळावा. जे अमलबाजवणी करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रांताधिकारी श्रीमती अहिरे यांनी दिला आहे. संजय चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. व्यापारी मनीष जोशी, श्री. वाणी, सलीम टोपी, पत्रकार संजय पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आवर्जून वाचा- भारतातील रहस्यमय असा..हाडांचा सांगाड्यांचा रुपकुंड तलाव; संशोधनातून या गोष्टी आल्या समोर
नियम पाळावे
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरावा. सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.