जळगाव

गंभीर प्रकार..खासगी लॅबमधील तपासणी केलेल्या ‘त्या’ बाधितांना ना कॉल, ना निरोप 

सचिन जोशी

जळगाव : शहरात कोरोनाची तपासणी शासकीय केंद्रांसह आता खासगी प्रयोगशाळांमधूनही मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, खासगी लॅबमधून तपासणी करून बाधित आढळून आलेल्या रुग्णांना महापालिका यंत्रणेकडून ना कॉल केला जातोय, ना विलगीकरणासाठी निरोप येतोय. त्या मुळे हे बाधित शहरभर मोकाट फिरत असल्याचे चित्र सध्या दिसतेय. 


जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. गेल्या १५ दिवसांपासून दररोज हजारांवर रुग्ण आढळून येत असून, जळगाव शहरातही रोज दोन-चारशे रुग्ण समोर येत आहेत. त्या मुळे तपासण्याही वाढल्या असून, शासकीय तपासणी केंद्रांवर अतिरिक्त ताण पडत आहे. 

खासगी लॅबमध्येही गर्दी 
ज्या रुग्णांना काही लक्षणे आहेत अथवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य बाधित आढळून आलेत, असे लोक शासकीय तपासणी केंद्रावरील गर्दीत जाण्याचे टाळून खासगी प्रयोगशाळांमधून तपासणी करून घेत आहेत. काही खासगी लॅबमध्ये रॅपिड ॲन्टिजेन व आरटीपीसीआर अशा दोघा स्वरूपाच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे लॅबमध्येही गर्दी होत आहे. 

बाधितांशी संपर्कच नाही 
खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी आलेल्या रुग्णांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकासह नोंद केली जाते. ॲन्टिजेन चाचणी केली तर लगेच काही वेळात अहवाल दिला जातो. आरटीपीसीआर चाचणी केली असता, साधारण २४ तासांनंतर अहवाल प्राप्त होतो. लॅबकडून रुग्णास त्याबाबत कळविले जाते. मात्र, या रुग्णांना महापालिका अथवा शासकीय यंत्रणेकडून कोणताही कॉल येत नाही किंवा विलगीकरणासाठी निरोपही दिला जात नाही, असा अनुभव येतोय. 

बाधित फिरताहेत शहरभर 
अशाप्रकारे खासगी लॅबमधून तपासणी करून बाधित आढळून आलेल्या रुग्णांवर कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नाही. हे रुग्ण अहवाल प्राप्त होताच खासगी क्लिनिकमध्ये जाऊन मार्गदर्शन घेतात, सीटी स्कॅन, कोविड प्रोफाइल ब्लड टेस्ट व पुढे मेडिकलवर औषधांसाठी फिरतानाचे प्रकार समोर येत आहेत. खासगी लॅबमधून महापालिका अथवा शासकीय यंत्रणेला बाधित रुग्णांबाबत माहिती देण्याची यंत्रणा नाही का, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT