पारोळाः ग्रामीण भागात कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नुकतीच सरपंच यांचे अध्यक्षतेखाली कोरोना ग्रामसमितीची स्थापना करण्यात आली.यात सरपंच अध्यक्ष तर ग्रामसेवक व पोलिस पाटील हे सचिव आहेत.तर तलाठी,आशावर्कर व रेशन दुकानदार समितीत काम करणारे आहेत.मागील आठ दिवसात ज्या गावात सलग कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण आढळुन येत आहे.अश्या गावातील ग्रामसमितीने प्रतिबंधात्मक क्षेत्र निर्माण करुन आरोग्य सर्वेक्षण घेणे गरजेचे आहे.गावपातळीवर कोरोना नियंत्रण आणणेसाठी ग्रामसमितीवर ही जबाबदारी असल्याचे प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी सांगितले.
आवश्य वाचा- विद्यार्थिनीवर अत्याचार.. बाळाच्या डीएनए अहवालाने गुन्हा सिद्ध; आरोपीस दहा वर्षांची शिक्षा
तहसिल कार्यालयात ग्रामीण भागातील कोरोना आढावा बैठक प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसिलदार अनिल गवांदे,गटविकास अधिकारी एन आर पाटील,पंचायत समिती उपसभापती अशोक पाटील,जि प सदस्य हिम्मत पाटील,इंधवेचे जितेंद्र पाटील, यांच्यासह सावखेडहोळ, सावखेड तुर्क, मंगरूळ, मुंदाणेे प्र अ , तामसवाडी,अंबापिम्प्री, टोळी, राजवड,शेळावे बु.,भोकरबारी, बहादरपुर आणि शिरसोदे येथील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व पोलिस पाटील उपस्थित होते.
ग्राम समितीने जबाबदारी पार पाडावी
प्रांत विनय गोसावी म्हणाले कि,वरिल गावात मागील आठ दिवसातील संपर्क आलेले लोकांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यादी करून स्वब घेणे,गावात सलग 2 ते 3 दिवस रुग्ण आल्यास स्वब कॅम्प घेणे, गावात स्वच्छता,कंटेंटमेंट झोन बोर्ड व आरोग्य सर्वेक्षण,गावात ऑक्सिजन सिलेंडर व्यवस्था,होम आयसोलेशन मधील पाँझिटीव्ह रुग्ण बाहेर न फिरणे,गावात लग्न मध्ये गर्दी न होऊ देणे,मास्क चा वापर याबाबत ग्राम समितीने चोख जबादारी पार पाडावी.तसेच कोरोना महामारीत कर्तव्यावर कसुर करणार्या शासकिय कर्मचार्यावर निलंबनाची कारवाई देखील केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लग्न, अंत्यविधीला 20 लोकांनाच परवानगी
शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा वाढते प्रमाण लक्षात घेता लग्नकार्य व अंत्यविधीला 20 पेक्षा जास्त जण उपस्थित राहणार नाहीत.याबाबत ग्रामसमितीने दक्ष राहणे गरजेचे आहे.तसेच परिसरात अवैध्यपणे दारु पिणारे व विकणारे यांचेवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिस पाटील यांची आहे.यात कसुर केल्यास संबंधित पोलिस पाटील यांचे निलंबन करण्यात येईल.गावपातळीवर कोरोना महामारी बाबत जनजागृती होणे गरजेचे असुन स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेत महामारीत योगदान दिले तर नक्कीच अश्यांचे स्वागत केले जाईल.हेतु एकच आहे कि,कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा.सर्वाच्या सामुहीक प्रयत्नातुन ही लढाई आपल्या पार करावी लागणार असल्याचे आवाहन त्यांनी केले.दरम्यान गावात दारुबंदीवर कडक निर्बंध आणुन प्रशासनाने कारवाईचे सत्र सुरु करण्याची अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.