Corona vaccination hundred percent Do it Ajit Pawar  sakal
जळगाव

जळगाव : कोरोना लसीकरण शंभर टक्के करा; अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार : कोरोना आढावा बैठकीत सूचना

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी ओमिक्रॉनचा(Omicron) संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील लसीकरणाला अधिकाधिक गती द्यावी, घरोघरी जाऊन लसीकरण (Vaccination) मोहीम पूर्ण करावी, कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, शंभर टक्के लसीकरण पूर्ण करा, ऑक्सिजन प्रकल्प सक्षम ठेवा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी (ता. १७) येथे दिल्या.

जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या कामकाजाचा, कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि उपाययोजनांची आढावा बैठक येथील नियोजन भवनात आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, खासदार रक्षा खडसे, महापौर जयश्री महाजन, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

कोविड लसीकरण वाढविण्यासाठी सुरू असलेल्या उपायांची माहिती जिल्हाधिकारी राऊत यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीच्या खर्चाची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी दिली. कोविडबाबतच्या उपाययोजनांचे सादरीकरण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण यांनी केले. आमदार संजय सावकारे, शिरीष चौधरी, किशोर पाटील, सुरेश भोळे, चंदक्रांत पाटील, मंगेश चव्हाण, अनिल पाटील, आमदार लताताई सोनवणे, सर्व कार्यान्वयन यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

रुग्णालयांचे फायर ऑडिट करा

उपमुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात अधिकाधिक विकासकामे होण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून संपूर्ण निधी उपलब्ध करून दिलेला आहे. या निधीच्या माध्यमातून कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाला प्राधान्य द्यावे. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रीकल ऑडिट करावे. दुसऱ्या टप्प्यातील सर्वोच्च ऑक्सिजन मागणीच्या तिप्पट ऑक्सिजनच्या उपलब्धतेचे नियेाजन करावे, मास्क वापरण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करावी. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेचे व शाळांना संरक्षणभिंतीच्या कामांचे, जिल्ह्यात अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत खर्चाचे प्रमाण अधिक असल्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

नियोजनची काढली लक्तरे

नियोजन भवनात सभा सुरू होण्यापूर्वीच मंत्री पवार यांनी नियोजन भवनातील त्रुटीची लक्तरे काढली. सभागृहात स्पीकर, विजेच्या तुटलेल्या वायरी, ए. सी. चे तुटलेले यंत्रे, स्पीकरची यंत्रणा खराब होती त्यावरून आपण सातव्या वेतन आयोगाचा पगार घेतो खालच्या अधिकाऱ्यांकडून काम करून घेता येत नाही का ? या असुविधांकडे लक्ष देता येत नाही का ? असा प्रश्‍न नियोजन अधिकाऱ्यांना केला. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.

व्यक्तिगत बोलायला अधिवेशनात भेटू...

आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्री पवार यांना आमदारांना वेळ देण्याबाबत विनंती केली. त्यावर पवारांनी मी बैठक घेतो आहे, तुमच्या प्रश्‍नांना उत्तरे देत आहे. हा तुम्हाला वेळच देत आहे ना. व्यक्तिगत काही असेल तर मुंबईत या, अधिवेशन आहे, तेव्हा बोलू.

वेळ पाळा... आमदारांना सूचना

बैठकीची वेळ नऊची असताना पवार वेळेआधीच नियोजन भवनात ८.५० ला हजर झाले. तीन आमदार अर्धा तास, पाऊण तास उशिराने आले. त्यांनी काही प्रश्‍न विचारले. त्याची उत्तरे मंत्री पवार यांनी अगोदरच दिली होती. या प्रश्‍नांची माहिती मी अगोदरच दिलीय. तुम्ही बैठकीला उशिरा आलात, याची जाणीव करून दिली. जळगाव होते म्हणून बैठक नऊला ठेवली, पुण्यात असती तर आठलाच बैठक घेतली असती, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT