cotton crop crisis esakal
जळगाव

Jalgaon News : कापूस मार्केट ‘क्रॅश’ अन् भावात घसरण सुरूच! CCIच्या केंद्रावरही कापूस येईना

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यात ‘सीसीआय’ने खुल्या बाजारात कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. असे असताना देशभरातील कापसाचे दर गडगडून कापूस मार्केट ‘क्रैश’ झाले. यामुळे शेतकऱ्यांनी राज्यभरात कापूस विक्री थांबविली आहे. कापूसच खरेदी केंद्रावर येत नसल्याने नगर, नंदुरबार केंद्र ओस पडली आहेत.

इतर केंद्राची ही स्थिती आहे, तर नवीन सुरू होणाऱ्या काय स्थिती असेल? यामुळे जळगावचेही केंद्र सुरू लवकर सुरू होणार नसल्याचे चित्र आहे. साडेआठ हजारांवरून सात हजार ३०० ते साडेसात हजारांपर्यंत कापसाचे दर खाली आले आहेत. (Cotton market crash and price continues to fall at center of CCI no cotton Jalgaon News)

कापसाला खासगी व्यापारी आठ ते साडेआठ हजार दर देत होते. मात्र, कापसाला दहा ते १३ हजारांचा दर मिळावा, अशी अपेक्षा करीत शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणण्याचे टाळले आहे. कापसाचा हमीभाव सहा हजार ३८० रुपये आहे. व्यापारी आठ ते साडेआठ हजार दर देत आहेत. कापूस उत्पादक दहा ते तेरा हजारांचा दर मागताहेत. यामुळे कापूस बाजारात येत नसल्याने कापूस बाजार एकदम थंडावत आहे. कापूस उत्पादकांची होणारी कोंडी फोडण्यासाठी ‘सीसीआय’ने खुल्या बाजारात उतरून कापूस खरेदीचा निर्णय घेत आठ हजार ४०० रुपये दर दिला होता.

नगर, सिल्लोड, नंदुरबार आदी ठिकाणी सीसीआयने कापूस खरेदी केंद्रे सुरू केली. मात्र, सोमवार (ता. २६)पासून कापसाचे मार्केट क्रॅश झाले. दरात तब्बल एक हजाराची घसरण झाली. दरात घसरण झाल्याने आजही कापूस बाजारात विक्रीस येत नसल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खंडीचे दर ५२ ते ५७ हजार झाले. यामुळे कापसाला दरात आणखी घसरण झाली. काही दिवसांत कापसाचे दर सहा हजारांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

संक्रातीपर्यंत असेच चित्र

कापूस उत्पादकांसाठी कापसाच्या दरातही घसरण नुकसानकारहेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'क आहे. मात्र, कापूस दराचे चित्र असेच मकर संक्रांतीपर्यंत सुरू राहील. नंतर कदाचित दरात वाढ होण्याची चिन्हे असतील. मात्र, तोपर्यंत दर न वाढल्यास ‘सीसीआय’ला कापूस खरेदी हमीभावात करावी लागण्याची शक्यता आहे.

"शेतकऱ्यांना अधिक भाव मिळावा, म्हणून आम्ही खुल्या बाजारात कापूस खरेदीसाठी राज्यात उतरलो होतो. जळगावसह खानदेशातही खरेदी सुरू करणार होतो. मात्र, कापूस मार्केट ‘ क्रॅश’ झाल्याने दर गडगडले आहेत. ज्याठिकाणी कापूस खरेदी सुरू केली, त्याठिकाणी कापूसच येत नाही. ८५ टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. मकरसंक्रांतीनंतर दरात सुधारणा न झाल्यास ‘सीसीआय’ हमीभावाने कापूस खरेदी करेल."-अर्जुन दवे, विभागीय व्यवस्थापक, सीसीआय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT