cottan esakal
जळगाव

Jalgaon News : ‘सीसीआय’ ची कापूस खरेदी वांध्यात; जाचक अटींमुळे शासकीय कापूस खरेदीचा मुहूर्त टळणार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कापसाला सात हजारापर्यंत मिळत असलेल्या दरामुळे ‘सीसीआय’ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदी केंद्रे दिवाळीनंतर सुरू होते. मात्र सीसीआय’ने जिल्ह्यात ज्याठिकाणी केंद्रे सुरू करणार आहे, त्याठिकाणी मुंबई फायर नियंत्रण बेार्डाची परवानगीची अट घातली आहे.

यामुळे सीसीआय’ची खरेदी दिवाळीनंतरही रखडणार असल्याचे चित्र आहे.( Cotton purchase of CCI face loss jalgaon news )

‘सीसीसी’ने जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदीसाठी हालचाली सुरू केल्या. संबंधित जिनिंग चालकांना नियमावलीही देण्यात आली. यंदा इतर नियम सर्वांना मान्य आहे. मात्र जळगाव ऐवजी मुंबई फायर नियंत्रण बोर्डाची ‘एनओसी’ची अट योग्य नाही. या परवानगीला खर्चही आठ लाखापर्यंत आहे. गतवर्षीपर्यंत जळगाव फायर नियंत्रण बोर्डाची परवानगी चालत होती.

परवानगीला तीन- चार महिने

आता मात्र मुंबई फायर नियंत्रण बोर्डाची परवानगी जिनिंग चालकांना काढणे खर्चिक व वेळखाऊ काम आहे. ही परवानगी मिळविण्यासाठी किमान तीन ते चार महिने लागतील. अन खर्चही लागेल. यामुळे ही अट रद्द करून जळगाव फायर नियंत्रण बोर्डाची एनओसी’ लागू केली तरच जळगाव जिल्हयात सीसीआय’ची कापूस खरेदी आम्ही सुरू करू असे खरेदीदारांचे म्हणणे आहे.

यंदा झालेल्या अत्यल्प पावसामुळे अद्यापही खरिपातील कोरडवाहूचा कापूस आला नाही. जो आला आहे, तो बागायती क्षेत्रातील आहे. त्यात मॉइश्‍चर (ओल) आहे. कापसाला ७२०० ते ७३००पर्यंत व्यापारी दर आहे. तरीही हवा तसा कापूस विक्रीस येत नाही.

गेल्यास ‘सीसीआय’ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदी केंद्रे सुरू करणार आहे. जिल्ह्यात अकरा केंद्रे प्रस्तावित असल्याची माहिती ‘सीसीआय’चे विभागीय व्यवस्थापक अमरनाथ रेड्डी यांनी दिली होती.

दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर सरकारी कापूस खरेदी सुरू होते. मात्र यंदा दिवाळीनंतर सरकारी कापूस खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. पणन महासंघाच्या कापूस खरेदीचा प्रश्न अद्याप अधांतरी असून 'सीसीआय' सहा केंद्रांवर खरेदी करणार आहे. ‘सीसीआय’चा ‘सब एजंट' म्हणून पणन महासंघ दरवर्षी कापूस खरेदी करते. पणन महासंघाकडून राज्यात ५० केंद्रावर कापूस खरेदी होत असते.

अकरा झोनमध्ये खरेदी

जळगाव, नागपूर, वणी, यवतमाळ, अमरावती, अकोला, खामगाव, परभणी, नांदेड, परळी व छत्रपती संभाजीनगर या अकरा झोनमध्ये दोन टप्प्यांत कापूस खरेदीची सुरवात पणन करते. यंदा महासंघाचे प्रयत्न सुरू असले, तरी सरकार काय निर्णय घेणार, यावर पणन केंद्राचे भविष्य अवलंबून आहे. अजून सरकारने कापूस विकत घेण्याबाबत भूमिका जाहीर केलेली नाही.

बाजारात कापसाला व्यापारी भविष्यात देणारा संभाव्य दर पाहता, शेतकरी कापूस व्यापाऱ्यांना कापूस विकतील असे चित्र नाही. त्यामुळे ‘सीसीआय’ ने कापूस खरेदी केल्यास शेतकऱ्यांना किमान हमीभावाचा दिलासा मिळेल. मात्र सीसीआय’च्या जाचक अटींमुळे तीही खरेदी रखडण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT