cotton rate hike esakal
जळगाव

Cotton Rate Hike : पांढऱ्या सोन्याला 8 हजारांचा दर

सकाळ वृत्तसेवा

Cotton Rate Hike : कापूस (Cotton) दरात सुधारणा झाली असून, प्रतिक्विंटर सुमारे आठ हजारांपर्यंत पोचले आहेत. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश येथे कापसाची आवक कमी झाल्याने हा भाव मिळत असल्याचे जाणकारांचे मत आहे. (cotton rate hike to about 8 thousand per quintal jalgaon news)

यामुळे शेतकऱ्यात आनंद निर्माण झाला आहे. दरम्यान, येणाऱ्या आठ, दहा दिवसांत कापसाचे दर प्रतिक्विंटल वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात भाव वधारेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता. मात्र, त्यांचा भ्रमनिरास झाल्या मागील महिन्यापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली.

अमळनेर, पारोळा, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, बोदवड, चोपडा आदी भागांतही किमान ७० टक्केच विक्री झाली. मागील महिन्यात कापसाला भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी निर्माण झाली होती.

किंबहुना शेतकरी हा आपला माल घरातून विक्रीस काढत नव्हता. त्यामुळे कापसाची आवक बाजारात मंदावली. याचा फायदा उर्वरित शेतकऱ्यांना होत असून, कापसाचे शनिवारचे (ता. ८) दर प्रतिक्विंटल आठ हजार ते आठ हजार पन्नास असे झाले असून, हे दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

मागील वर्षी पांढऱ्या सोन्याला प्रतिक्विंटल अकरा हजार ते बारा हजार रुपये दर होता. त्यामुळे यावर्षी देखील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात इतर पीक न घेता कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. मात्र यंदा कापसाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्यामुळे मध्यमवर्गीय शेतकरी यांनी गरजेपुरता कापूस विक्रीस काढला होता. तसेच बरेच शेतकऱ्यांनी आपल्या घरातच कापसाला सुरक्षित ठेवत भाव वाढीकडे प्रतीक्षा केली होती.

मात्र बऱ्याच वेळा अवकाळी पावसामुळे तसेच बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे उच्च प्रतीच्या कापसाला साधारणपणे साडेसात हजारापर्यंत भाव होता. मात्र भाव पुन्हा वाढल्याने शेतकऱ्यांनी भाऊगर्दी करत गरजेपुरता माल विक्रीस काढला होता. किंबहुना भाव वाढेल की नाही याबाबत शेतकऱ्यात घबराट निर्माण झाली होती.

मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून शेतकरी आपला माल बाजारात विक्रीस आणत नसल्यामुळे एकदम बाजारात कापसाची आवक कमी झाल्याने शनिवारी (ता. ८) चांगल्या प्रतिच्या कापसाला प्रतिक्विंटल आठ हजार रुपये दर मिळत आहे.

दरम्यान, परिस्थिती अशीच राहिली तर साधारणपणे कापसाला प्रतिक्विंटल आठ ते नऊ हजारादरम्यान दर मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र पुन्हा कापसाची आवक वाढली तर वाढलेले दर कमी होण्याची शक्यता देखील जाणकारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या दराबाबत शेतकरी किती प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

काहींकडून बाजार अस्थिर ठेवण्याचा प्रयत्न

कापूस दरात सुधारणा होत असतानाच नफखोर, खरेदीदार, खिसेभरू व्यापारी शेतकऱ्यांकडे ७० ते ८० टक्के कापूस शिल्लक असल्याचे सांगून दरांबाबत अनिश्‍चित स्थिती असल्याच्या बातम्या पसरवत आहेत. चुकीची माहिती देऊन बाजार सतत अस्थिर ठेवण्याचा, दरांवर दबाव कायम कसा राहील आणि आपले चांगभले कसे होईल, असा प्रयत्न काही खरेदीदार करीत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT