MLA Chandrakant Sonawne esakal
जळगाव

Jalgaon News : माजी आमदार चंद्रकांत सोनवणेंना न्यायालयाचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा

लासूर : चोपडा मतदारसंघाचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना घरकुल प्रकरणात सुनावण्यात आलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे त्यांच्या निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाचा हा निकाल गावात कळताच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.

घरकुल गैरव्यवहार प्रकरणात माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह जळगाव येथील तत्कालीन आजी- माजी नगरसेवकांना शिक्षा सुनावत त्यांना विधानसभेची निवडणूक लढण्यास अपात्र ठरविले होते. (Court relief to former MLA Chandrakant Sonawane Jalgaon News)

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

त्यामुळे आमदार सोनवणे यांच्या जागी त्यांच्याऐवजी त्यांच्या सौभाग्यवतींनी निवडणूक लढवून विजय संपादन केला होता. माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या माध्यमातून चोपडा मतदारसंघात विशेषतः लासूर गावात विकासाची अनेक कामे झाली आहेत.

त्यामुळे न्यायालयाच्या या निकालामुळे लासूरच्या ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना येथील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रा. ए. के. गंभीर, कैलास बाविस्कर, ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक महाजन, सुरेश माळी, शिवाजी पाटील, मुरलीधर सोनवणे, विजय बाविस्कर, प्रकाश माळी, किशोर माळी, अजय पालीवाल, दीपक महाजन, गोकूळ महाजन, देविदास मगरे, जगन्नाथ महाजन, लक्ष्मण बाविस्कर, पिताराम बारेला, गुलाब मगरे, सुरेश महाजन, पवन महाजन यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT