crop  crop insurance
जळगाव

Crop Competition : राज्यातंर्गत पीक स्पर्धेत जळगाव चमकले; हे आहेत पीक स्पर्धेत निवड झालेले शेतकरी..

राज्य स्तरावर दोन, तर विभागीय स्तरावर पाच शेतकऱ्यांची निवड

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कृषी विभागातर्फे राज्यातंर्गत पीक स्पर्धा (Crop Competition) रब्बी हंगाम २०२१ मध्ये राबविली होती.

या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांची राज्य स्तरावर, तर पाच शेतकऱ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली. (crop competition by Agriculture Department 2 were selected at state level and 5 farmers at divisional level jalgaon news)

राज्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. प्रयोगशील शेतकऱ्यांना उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यात वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

यामुळे कृषी उत्पादनांमध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्यातील एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीक स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा कृषी विभागातर्फे जळगाव जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आली होती, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाकूर यांनी कळविले आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

पीक स्पर्धेत निवड झालेले जळगाव जिल्ह्यातील शेतकरी असे : पीक-रब्बी ज्वारी (सर्वसाधारण गट) प्रमोद बापू माळी (पिंपरखेड, ता. भडगाव) राज्य स्तरीय प्रथम क्रमांक, उमेश दिलीप पाटील (वरखेड, ता. भडगाव) राज्य स्तरीय द्वितीय, रमेश मधुकर पाटील (खर्चाणे, ता. जामनेर) विभागीय स्तरीय प्रथम, श्रीमती लताबाई अशोक महाजन (केकतनिंभोरा, ता. जामनेर) विभागीय स्तरीय द्वितीय, स्वप्नील दत्तात्रय पाटील (सामरोद, ता. जामनेर) विभागीय स्तरीय तृतीय.

पीक- हरभरा (सर्वसाधारण गट) राकेश वसंत फेगडे (कोरपावली, ता. यावल) विभागीय स्तर तृतीय, तर आदिवासी गटातून श्रीमती सवित्रीबाई भारसिंग बारेला (वाघझिरा, ता. यावल) यांची विभागीय स्तरीय तृतीय क्रमांकावर निवड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: फेड रिझर्व्ह ते डॉलर इंडेक्स...'या' 5 कारणांमुळे शेअर बाजार आणखी कोसळणार; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Baramati Assembly News: बारामतीत खळबळ! श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये रात्री सर्च ऑपरेशन, काय म्हणाले युगेंद्र पवार ?

थोडक्यात वाचला! फलंदाजाचा स्ट्रेट ड्राईव्ह अन् अम्पायरचा चेहरा...; भारतीय संघ सराव करतोय त्या 'पर्थ' येथे घडला प्रकार

Latest Marathi News Updates : वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अपघात

Ramesh Kadam: शरद पवार गटाच्या नेत्याच्या अपहरणाचा प्रयत्न, म्हणाले-बाबा सिद्दिकींप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव

SCROLL FOR NEXT