Crop Insurance : शासनाने मंजूर केलेली कापूस पिकाचा आगाऊ पीकविमा २५ टक्के रक्कमेचा आदेश ओरिएंटल विमा कंपनीने झुगारून आयुक्तांकडे अपील केले होते. सुनावणी दरम्यान विभागीय आयुक्त आणि कृषी सहआयुक्तांनी विमा कंपनीचे अपील फेटाळल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जळगाव जिल्ह्यात सतत पावसाचा खंड पडल्याने कापूस, मका, बाजरी, ज्वारी, उडीद, मूग, सोयाबिन आदी पिकांचे नुकसान झाले होते. २१ दिवसांच्या वर खंड पडल्यास विमा कंपनीने शेतकऱ्यांना पीकविम्याच्या २५ टक्के रक्कम आगाऊ द्यावी, असा नियम असताना सरकारी विमा कंपनी ओरिएंटल इन्श्युरांस कंपनी २५ टक्के रक्कम देण्यास तयार नव्हती. (Crop Insurance By Divisional Commissioner Joint Commissioner of Agriculture insurer appeal was dismissed jalgaon news gbp00)
खासदार उन्मेष पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात ७६ कोटी रुपये कापूस पिकासाठी मंजूर झाल्याचे जाहीर झाले होते. मात्र परिस्थिती वेगळीच होती. विमा कंपनीने कमी खर्चाचे फक्त उडीद, मूग, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन या पिकांसाठी ४ कोटी ८८ लाख रुपये विमा ग्राह्य धरला होता.
सर्वाधिक लागवड असलेल्या कापूस पिकाचा विमा ग्राह्य न धरता नाशिक विभागाचे कृषी सहआयुक्त यांच्याकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर रविवारी (ता. १९) नाशिक येथे सुनावणी ठेवण्यात आली होती. सुनावणीला दोन शेतकरी प्रतिनिधी बोलावण्यात आले होते.
नाशिक येथील सुनावणीस आयुक्त राधाकृष्ण गमे, कृषी सहआयुक्त मोहन वाघ, जिल्हा कृषी अधीक्षक चलवदे, शेतकरी प्रतिनिधी प्रा. सुभाष पाटील (शिरूड ता.अमळनेर), दिनेश पाटील (धरणगाव), प्रशांत साळुंखे (मारवड) व ओरिएंटल विमा कंपनीचे प्रतिनिधी इंगळे हजर होते.
यावेळी विमा प्रतिनिधी इंगळे यांनी कृषी विभागाने पीक नुकसानीचे पंचनामे करताना विमा प्रतिनिधींना बोलावलेच नाही, असा हास्यास्पद आरोप केला.
त्यावेळी त्यांचा मुद्दा खोडताना प्रा. सुभाष पाटील व कृषी अधीक्षक चलवदे यांनी पंचनामे करताना विमा प्रतिनिधी उपस्थित असल्याचे पुरावेच सादर केले. विमा कंपनीचे आरोप खोटे असल्याचे उघडकीस येताच आयुक्त गमे आणि कृषी सहआयुक्त वाघ यांनी विमा कंपनीचे अपील फेटाळून लावले.
त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र आयुक्तांच्या निर्णयावर विमा कंपनी शासनाकडे अपील करू शकते. सरकारी कंपनीच जर शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी खोटे अहवाल सादर करत असेल तर शेतकऱ्यांना न्याय कोण देईल म्हणत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.