जळगाव

Jalgaon Crime News : तिने घर मागताच वजन मापाने ठेचून केला खून...

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : भाजीपाला विक्रेत्या महिलेचा लोखंडी वजन मापाने डोक ठेचून खून करण्यात आला होता.

त्या महिलेसोबत ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये असलेल्या भामट्यानेच तिचा खून केल्याचे वस्तुनिष्ट पुरावे आणि साक्षीच्या आधारावर सिद्ध झाले. जिल्‍हा व सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. (crushed by weight measure Life imprisonment for murder jalgaon crime news)

रामेश्वर कॉलनीत विधवा ४० वर्षीय वंदना पाटील मुलगा दीपकसोबत वास्तव्यास होती. भाजीपाला विक्री करून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होती. त्यांच्यासोबतच बाजारात भाजी विक्रेता सुरेश सुकलाल महाजन (वय ५५) याच्याशी ओळखी व त्यातून प्रेमसंबंध जुळले. मुलगा दीपकचा विवाह झाल्याने वंदना पाटील आणि सुरेश महाजन लिव इन रिलेशनमध्ये राहत होते.

वंदनाबाईने आता मुलाचे लग्न झाले आहे. आपण स्वतंत्र घर घेऊन राहू, यासाठी महाजन याच्याकडे तगादा लावला होता. सुरेशनेही घर घेण्यास होकार दिला. मात्र, काही दिवसांनी तो टाळाटाळ करू लागला होता.

वंदनाबाई आणि सुरेश महाजन रामलाल पवार यांच्या घरी पैसे घेण्यासाठी आले होते. ५० हजार रोख घेऊन दोघी घरी परतले. दोघेही रात्री सोबत होते. मात्र, दिवस उजाडताच रामेश्वर कॉलनीत वंदनाबाईचा राहत्या घरात खून झाला होता. याबाबत एमआयडीसी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

५० हजार अन्‌ घराचे कारण

घर घेण्यासाठी वंदनाबाई पैशांची जमवाजमव करीत होती. ५० हजारांवरून वादाला सुरवात झाली. सुरेश महाजन याने लोखंडी वजन मापाने वंदनाचे डोके ठेचून काढले. जीव शिल्लक असल्याने ओढणीने गळा आवळून तिचा खून करून दिवस उजाडण्यापूर्वीच पळ काढला होता.

घटनाक्रम न सांगता लपवाछपवी

जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. सापटणेकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. मृत महिलेचा मुलगा दीपक, ५० हजार देणारा रामलाल पवार, शेजारील रहिवासी, घटनेचे तपासाधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष नोंदविण्यात आली. ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी संशयिताची उलट तपासणी नोंदवली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याला घटनाक्रम आणि वंदनाबाई कशा मेल्या याबाबत विचारणा झाली. आदल्या दिवसाबाबत आणि इतरही माहिती तो जाणीवपूर्वक सांगत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. साक्षीदारांच्या साक्ष, पुराव्याच्या आधारे दोषारोप निश्‍चित झाले.

खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने सुरेश महाजन यास जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी ताराचंद जावळे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT