जळगाव : गृहकर्जाचा हप्ता मिळाला नाही, अशी थाप मारून भामट्यांनी तक्रारदाराच्या खात्यातून १० लाखांची रक्कम परस्पर लंपास केली होती. याबाबत सायबर पोलिसांत गुन्हा दाखल होताच तांत्रिक तपासाअंती पश्चिम बंगालमधील दोन्ही खाती गोठवून सायबर पोलिसांनी दहा लाख रुपये परत मिळविले आहेत.
जळगाव शहरातील सतीश काळमेघ (वय ५०) यांना १७ नोव्हेंबरला एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. मी ‘एचडीएफसी बँकेच्या हाउसिंग लोन डिपार्टमेंटमधून बोलत असून, तुमचा कर्जाचा हप्ता कपात झाला नाही. आजच्या आज ऑनलाइन हप्ता भरला नाही, तर तुम्हाला जास्तीचा दंड द्यावा लागेल’, असे धमकावून काळमेघ यांना ऑनलाइन हप्ता भरण्यास भाग पाडले. मात्र, हा हप्ता बँकेच्या खात्यात न जाता भामट्यांनी त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून तसा अर्ज भरण्यास सांगितले.
हेही वाचा: Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’
हा ऑनलाइन फॉर्म भरताच काळमेघ यांच्या बँक खात्याची संपूर्ण डिटेल्स सायबर गुन्हेगारांना प्राप्त झाल्या. त्याच आधारे त्यांनी १० लाख रुपये परस्पर वर्ग करून लाटले होते. बँकेत गेल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काळमेघ यांनी तत्काळ सायबर पोलिसांत तक्रार दिली.
पश्चिम बंगालच्या खात्यातून रक्कम वर्ग
पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे, सचिन सोनवणे व श्रीकांत सोनवणे यांनी तत्काळ तांत्रिक तपासाला सुरवात केली. काळमेघ यांच्या बँक खात्यातून एसबीआय, पश्चिम बंगालमधील एका खात्यात ही रक्कम वर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.
अवघ्या दोन तासांत सुरवातीला नऊ व नंतर एक, असे एकूण १० लाख रुपये वर्ग झालेले दोन्ही बँक खाती पोलिसांनी गोठवून घेतले. त्यानंतर काळमेघ यांच्या बँकेशी संपर्क साधून ही रक्कम पुन्हा त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. दोन दिवसांनी काळमेघ यांना ही रक्कम परत मिळाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.