जळगाव : बँकेचे खाते बंद पडेल, अशी भीती दाखवून जळगाव शहरातील कोल्हेनगर येथील सेवानिवृत्त वृद्धाची तब्बल नऊ लाख १९ हजार ९९५ रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील कोल्हेनगर परिसरात सुभाष राजाराम पाटील (वय ६१) कुटुंबीयांस वास्तव्यास आहेत. ते सेवानिवृत्त शासकीय नोकरदार असून, मंगळवारी (ता. ६) अज्ञात व्यक्तीने सुभाष पाटील यांना खोटा व बनावट संदेश मोबाईलवर पाठविला. नंतर ८७६८२५१४६९ या मोबाईल नंबरवरून त्यांना फोन करत तुमचे बँकेचे खाते बंद पडेल, अशी भीती दाखवून बँक खाते चालू ठेवण्यासाठी मोबाईलवर पाठवलेल्या संदेशात असलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले. त्यात आधारकार्ड व पॅनकार्डची माहिती भरण्यास सांगितली.
OTP आला अन् रक्कम घेवून गेला...
माहिती भरताच सुभाष पाटील यांच्या मोबाईलवर ओटीपी आला. तो संबंधिताने विचारून सुभाष पाटील यांच्या बँक खात्यातून तब्बल नऊ लाख १९ हजार ९९५ रुपये ऑनलाइन परस्पर काढून घेतले. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत ८७६८२५१४६९ आणि अन्य अज्ञात मोबाईलधारकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.