esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : सायबर पोलिसांकडून बंगाली टोळी अटकेत; पर्यटन आवडणाऱ्यांना करायचे टार्गेट

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील ख्यातनाम डॉक्टरला तब्बल ११ लाख तीन हजार ८०० रुपयांना गंडविणारी पश्चिम बंगालच्या टोळीला जळगाव सायबर पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून भारतातील पर्यटनाचा छंद असलेल्या लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा अंदाज असून, त्याचा तपास सायबर पोलिस करीत आहेत. (Cyber ​​Police Arrested West Bengal Gang Who Extorted Rs 11 Lakh from Famous Doctor jalgaon fraud crime news)

जळगाव शहरातील मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास बेंडाळे यांनी कुटुंबीयांसह पर्यटनाचा बेत आखला होता. त्यांच्या फेसबुकवर टॅग केलेल्या थिंक ट्रीप या बनावट जाहिरातीद्वारे बेंडाळे कुटुंबीयांना भूलथापा देत बंगाली टोळीने विश्वास संपादन केला व पूर्वांचलातील सात राज्ये (सेव्हन सिस्टर) पाहण्यासाठी ॲडव्हॉन्स तीन लाख १५ हजार, नंतर सात लाख २० हजार आणि कोविडबाधित आढळल्यास किंवा क्वारंटाइन व्हावे लागल्यास स्वतंत्र हॉटेलचा खर्च वेगळा, असे एकूण ११ लाख तीन हजार ८०० रुपये उकळले.

...असा झाला प्रकार उघड

मात्र, कुठल्याही बुकिंग न करता या भामट्यांनी टाळाटाळ करायला सुरवात केली. ठरल्याप्रमाणे सहलीची तारीख जवळ येत असताना, बुकिंग नसल्याचे लक्षात आल्यावर अधिक चौकशी केली असता, आपली फसवणूक झाल्याचे डॉ. बेंडाळे यांच्या लक्षात आले. त्यांनी १३ मार्चला सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पोलिसांचा सलग तपास

गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनात सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक उतेकर यांच्या तांत्रिकतज्ज्ञ पथकातील राजेश चौधरी, दिलीप चिंचोले, दिगंबर थोरात, गौरव पाटील यांनी मोबाईल, व्हॉट्‌सॲपद्वारे झालेले संभाषण, चॅटिंगचे तांत्रिक विश्लेषण करून संशयितांचा छडा लावला.

परराज्यातील टोळीमुळे अडचण

ही टोळी पश्चिम बंगाल येथून ऑपरेट होत असल्याने तपासाला अडचणी येत होत्या. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी स्वतः याबाबत पाठपुरावा करून टीम रवाना केली. पथकाने पश्‍चिम बंगाल येथून रिकार्डो गोम्स क्रिस्टोफर गोम्स (वय ३६), प्रियांशू बिसवास सैवाल बिसवास (२३), अनिकेत बिसवास अभिजित बिसवास(२४) यांना पश्चिम बंगालच्या प्रांतिक फेस कोलकता येथून अटक केली.

त्यांच्या ताब्यातून आठ मोबाईल, तीन संगणक, आठ एटीएम, लॅपटॉप, २० हजारांची रोकड, असा ऐवज ताब्यात घेतला. संशयितांना न्यायालयात हजर केल्यावर त्यांना कोठडीत रवाना करण्यात आले.

नागरिकांना आवाहन

ऑनलाइन सहलींचे बुकिंग करताना संबंधित एजन्सी विश्वासपात्र आहे किंवा नाही, खरोखर अशी एजन्सी अस्तित्वात नसताना केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसणाऱ्या चित्रांवर आणि जाहिरातींवर विश्वास न ठेवता खात्री करावी. तसेच ऑनलाइन पेमेंट करताना खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: पुणे-बंगळूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Nashik News : ‘घाबरू नको बाळा, मतदान होईपर्यंत मला काहीच होणार नाही’; आईच्या निधनानंतर 24 तासांत नायब तहसीलदार पुन्हा कर्तव्यावर

Sameer Bhujbal vs Suhas Kande: तुझा मर्डर आज फिक्स...सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं?

Mumbai Voting: मतदानाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो आज मध्यरात्रीपर्यंत धावणार

Supriya Sule: ऑडिओ क्लिप प्रकरण; ते सांगतील त्या ठिकाणी येऊन उत्तर देण्याची माझी तयारी, सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT