Girna bridge esakal
जळगाव

Jalgaon News : गिरणेवर समांतर पुलासह बंधाराही 100 टक्के शक्य

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : गिरणा नदीवर बांभोरी-निमखेडीदरम्यान पूलकम बंधारा प्रस्तावित असून, याठिकाणी बंधारा शक्य नसल्याचा अहवाल सादर केला असला, तरी या जागेवर तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असा बंधारा उभारणे शंभर टक्के शक्य आहे, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. या प्रकल्पाला तांत्रिकदृष्ट्या आधार सांगत त्याचे डिझाइन करून देण्याची तयारीही संबंधित तज्ज्ञांनी दर्शविली आहे.

गिरणा नदीवर राष्ट्रीय महामार्गावर सध्या अस्तित्वात असलेल्या मोठ्या पुलावरील वाहतुकीचा वाढता भार लक्षात घेता, चौपदरीकरणात बायपास होणाऱ्या महामार्गावर नव्याने पूल उभारला जात आहे. सहा-आठ महिन्यांत त्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

यादरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा करून नदीवर बांभोरी-निमखेडीला जोडणारा पूलकम बंधारा मंजूर करून घेतला. राज्य शासनाने गेल्याच महिन्यात या बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता दिली होती. (Dam parallel bridge over mill is also 100 percent possible Jalgaon News)

तांत्रिक अहवाल विरोधात

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या पुलाचा प्रस्ताव शासनाला सादर केल्यानंतर त्यात बांधकाम विभागाने अचानक यू-टर्न घेत याठिकाणी पूल होऊ शकतो. मात्र, गिरणा पात्राची स्थिती पाहता या जागेवर बंधारा शक्य नसल्याचा अहवाल दिला. यामुळे बंधारा कम पुलाचा प्रस्तावच बारगळण्याच्या स्थितीत आहे. बांधकाम विभागाने याठिकाणी बंधारा शक्य नाही, असा अहवाल देताना नेमकी कोणती कारणे दिली, हे समजू शकले नाही.

तज्ज्ञांच्या मते बंधारा शक्य

असे असले तरी यासंदर्भात तज्ज्ञांशी संपर्क केला असता, या जागेवर समांतर पुलासह बंधाराही शक्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मुळात गिरणा नदीचे पात्र काही ठिकाणे वगळता सर्वत्र सारख्याच स्वरूपाचे आहे. कांताई बंधारा ज्याठिकाणी उभारण्यात आला आहे, त्या ठिकाणची स्थिती निमखेडी- बांभोरीदरम्यानही आहे. वाळूसाठ्याच्या खोलीचे कारण दिले जाऊ शकते. मात्र, वरखेड- लोंढे प्रकल्पाच्या ठिकाणी १७ मीटर वाळू होती, तेथेही प्रकल्प झालाच आहे. शिवाय बांभोरी- निमखेडीदरम्यान ज्या ठिकाणी बंधाराकम पूल प्रस्तावित आहे, त्या जागेवर नदीपात्राची रुंदी १५० ते २०० मीटरच आहे. त्यामुळे पाच मीटर गेटचा बंधारा या जागेवर शक्य असल्याचा दावा पाटबंधारे विभागाचे तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील यांनी केला आहे.

गडकरी, राज्यपालांना पत्र

काही वर्षांपूर्वी या बंधारा कम पुलाचा विषय समोर आल्यानंतर जळगावातील लोकप्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना यासाठी साकडे घातले होते. गडकरींनी त्यासाठी साइट सूचविण्याच्या सूचना केल्या. ही जागा निश्‍चित झाल्यानंतर त्यांच्याकडे प्रस्ताव सादर करावयाचा आहे. मंत्री गिरीश महाजन यांनीही याबाबत राज्यपालाकडे पत्र दिले आहे.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

असा होईल लाभ

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासारख्या मोठ्या संस्थेला या परिसरात मुबलक पाण्याचा स्त्रोत नाही. विद्यापीठाच्या इमारती उंच टेकड्यांवर उभारण्यात आल्या आहेत. परिसर निसर्गरम्य असला आणि बाजूनेच गिरणा नदीपात्र असले, तरी पावसाळ्यातील दोन महिने वगळता पात्र सहसा कोरडेच असल्याने विद्यापीठाला पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत नाही. या बंधाऱ्यामुळे तो उपलब्ध होऊ शकतो. बंधाऱ्याचे काम झाल्यास परिसरातील भूजल पातळी वाढून विद्यापीठासह जैन इरिगेशन, बांभोरी, टाकरखेडा, सावखेड्यासह अन्य गावांना त्याचा लाभ मिळू शकेल. शिवाय सध्याच्या पुलास समांतर पूल झाल्यामुळे वाहतुकीचा भारही कमी होऊन वाहतूक कोंडी व अपघात टळू शकतील.

सात-आठ किलोमीटरपर्यंत नदीपात्र भरलेले राहील

पाण्याचे भविष्यातील दुर्भिक्ष्य आणि त्यामुळे निर्माण होणारे संकट, तसेच मोठ्या धरण, प्रकल्पांवरील खर्च बघता नद्यांवर लहान बंधारे उभारणे काळाची गरज आहे. त्यानुसार निमखेडी- बांभोरीदरम्यान बंधारा झाल्यास गिरणा नदीपात्र या बंधाऱ्यापासून कांताई बंधारा व पुढे त्याच्या बॅकवॉटरपर्यंत असे सुमारे सात-आठ किलोमीटरपर्यंत भरलेले राहील.

"निमखेडी-बांभोरीदरम्यान जुन्या महामार्गाच्या साईटवर समांतर पुलासह बंधाराही शक्य आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने सर्वेक्षण, अभ्यास करून अहवाल द्यावा. बंधाऱ्यासाठी आवश्‍यक त्या तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसह डिझाईन तयार करून देण्याची आपली तयारी आहे."

-प्रकाश पाटील, तांत्रिक सल्लागार, तापी पाटबंधारे महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT