farmers  sakal
जळगाव

जळगाव : चिनावल येथे पुन्हा ठिबक जाळून नुकसान

सावद्यात संतप्त शेतकऱ्यांचे ‘रास्ता रोको’; चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी ‘एलसीबी’चे पथक

सकाळ वृत्तसेवा

सावदा : रावेर, यावल तालुक्यातील आणि विशेष करून रोझोदा, चिनावल भागात असलेल्या शेतातील पिकांच्या चोऱ्या आणि नुकसानीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, यातील चोरांवर ठोस पोलिस कारवाई होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. रविवारी (ता. २७) देखील चिनावल शेतशिवारात प्रमोद भंगाळे यांच्या शेतात १० हजार केळी खोडांचे जमा करून ठेवलेले ठिबक सिंचन पेटवून दिले असून, दोन लाख रुपयांचे नुकसान केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावदा येथील बसस्थानकासमोर बनाना सिटी शिल्पाजवळ सकाळी दहाला ट्रॅक्टर आडवे लावून रास्तारोको आंदोलन सुरू केले. या वेळी महामंडलेश्‍वर जनार्दन हरी महाराज, शास्त्री भक्तीकिशोर दास, खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी यांनीही भेट देऊन शेतकऱ्यांच्या बाजूने सहानुभूती व्यक्त करून आंदोलनात सहभाग घेतला. तब्बल तीन तास हे आंदोलन सुरू होते.

ठोस कारवाई करावी आणि कारवाई न करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. डी. इंगोले यांची बदली झाल्याशिवाय व जिल्हा पोलिस अधीक्षक स्वतः आल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबविणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. अखेर अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली आणि चोऱ्यांसंदर्भात चौकशी आणि कारवाईसाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक नियुक्त केले असून, त्याचे नेतृत्व मी स्वतः करीत असून, दोषींवर ठोस कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन थांबविण्यात आले.

गवळी यांनी चिनावल येथे शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. या वेळी फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी किरण सोनवणे, रावेरचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे, यावलचे सु. बा. पाटील, निंभोरा येथील किरण धुमाळ, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे किरणकुमार बकाले, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, समाधान गायकवाड आदी उपस्थित होते. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना हॉटेल सिमरनतर्फे या वेळी चहापाणी देण्यात आले.

...यांची होती उपस्थिती

जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, रमेश महाराज, चिमण धांडे, श्रीकांत महाजन, राजेश वानखेडे, भरत महाजन, गोपाळ नेमाडे, योगेश बोरोले, कमलाकर भारंबे, तुषार महाजन, सागर भारंबे, ठकसेन पाटील, पंकज नारखेडे, गोपाळ पाटील, विनायक महाजन, कल्पेश नेमाडे, चंद्रकांत भंगाळे, बन्सी गारसे, राहुल शेंडे, राजू पाटील, कुंदन पाटील, सुनील बोंडे, राहुल नारखेडे, संदीप महाजन, दिनेश महाजन, सुनील गाजरे, भास्कर सरोदे, किशोर महाजन, विलास महाजन, स्वप्नील पाटील, परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. स्थानिक पोलिसांसह रावेर, निंभोरा, फैजपूर, यावल येथील सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

Pune Fake Voting: पुणे शहरातील सर्व ८ मतदारसंघांत फेक मतदान! कोथरुड अन् वडगावशेरीत सर्वाधिक

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

SCROLL FOR NEXT