A bunch of bananas cut and thrown away in a field in Shiwar. esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : अज्ञात माथेफिरूकडून केळी पिकाचे नुकसान; शेतकरी हैराण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Agriculture News : तालुक्‍यातील हिंगोणा येथे अज्ञात माथेफिरूने शेतातील केळीचे खोडं कापून फेकल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

हिंगोणा येथील शेतकरी भरत सुरेश नेहेते यांनी प्रमिला महाजन (गट क्रमांक ९६५) यांची शेती बटाईने केली आहे. ही शेती हिंगोणा गावापासून जवळच आहे.(Damage to banana crop by an unknown person jalgaon agriculture news)

ते गुरुवारी (ता. १६) सकाळी शेतात गेले असता, त्यांच्या शेतातील शंभर ते दीडशे केळी खोडं अज्ञात माथेफिरूने कापून फेकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

याचबरोबर याच रस्त्याने पुढे बोरखेडा गावालगत गजेंद्र राजपूत यांचे शेत असून, शेतातील शंभर ते दीडशे केळीची खोडं कापून फेकण्यात आली.

या घटनेमुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, केबल वायरची चोरी करणे, स्टार्टर चोरी अशा घटनांसह नैसर्गिक संकट तसेच पिकांच्या नुकसानामुळे शेतकरी हैराण आहे.

परिसरातील शेतशिवारांमध्ये पाणी भरण्यासाठी असणारे पाइप, वीजमोटारी, ठिबक संचाचे पाइप अशा साहित्याची दिवसाढवळ्या चोरी होत असताना अद्याप एकही चोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT