Jalgaon Dam Water : तालुक्यातील 10 ते 12 खेड्यांसह पारोळा शहराला पाणीपुरवठा करणारे बोरी धरणाचा पाण्याचा साठा पाणलोट क्षेत्रासह पुरेसा पाऊस पडत नसल्यामुळे आजवर बारा टक्क्यांवर असून तालुक्यातील लघु प्रकल्प देखील पाण्याअभावी अपूर्ण असल्यामुळे तालुक्यात पाणी प्रश्न चिंतेचे कारण ठरू लागला आहे.
दरम्यान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व तालुक्यात जोरदार पावसाची सुरुवात होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. (dams in parola have less water storage jalgaon news)
मागील वर्षाप्रमाणे यंदा देखील समाधानकारक पाऊस होऊन तालुक्याला वरदान ठरलेले बोरीधरण व तालुक्यातील इतर लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतील अशी अपेक्षा 15 ऑगस्ट पर्यंत होती. मात्र तालुक्यात कमी अधिक पाऊस पडत असल्यामुळे पिकांची उगवण क्षमता मोठ्या प्रमाणात खुंटली असून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे.
ठिंबकवर अवलंबून असलेली पिके सोडली तर पावसावर अवलंबून असलेली पिके बऱ्याच ठिकाणी जमिनीला लागून असून शेतकरी याबाबत असमाधानी असून तालुक्यासाठी पाणी प्रश्न आजचा स्थितीला चिंतनाची बाब बनला आहे.
तालुक्यात एकूण पाच मंडळ आहेत त्यात पारोळा, तामसवाडी, बहादरपूर शेळावे व चोरवड या मंडळात आज पर्यंत कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मशागती पूर्ण करून तो पावसाची प्रतीक्षा करीत आहे.
बोरी पाणी पातळी २६३.६६० मी.
एकुण साठा १८.१११ दलघमी
जिवंत साठा २.९५१ दलघमी
टक्केवारी ११.७३ ℅
आवक ०.०६८/५.८९७
पाऊस ००/१८६
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सावरखेडा ल. पा.
पाणीपातळी १०२.५४ मी.
एकुण साठा ०.३१०
उपयुक्त साठा ०.०५७
टक्केवारी ३.०℅
भोकरबारी -0.32 द.ल.घ.मी-4.50%
म्हसवे -1.11द.ल.घ.मी 32%
शिरसमणी-0.30 द.ल.घ.मी20%
पिंपळकोठा-0.40 द.ल.घ.मी20%
कंकराज -0.10 द.ल.घ.मी 5%
15 ऑगस्ट 2022 पूर्वी धरण तुडुंब मागील वर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात जोरदार व समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बोरी धरण हे 15 ऑगस्ट पूर्वी तुडुंब भरून वाहत होते.
मात्र आता धरणाच्या पाणी पातळी 12 टक्के जलसाठा असल्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.