तोंडापूर (जि. जळगाव) : जामनेर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या अजिंठा डोंगररांगांमध्ये असलेल्या चंदनाच्या झाडांची (Sandalwood Trees) मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. महागड्या चंदनाच्या लाकडाची चोरी होत असताना वन विभाग व पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चंदन तस्करांची (Sandalwood smugglers) टोळी फायदा घेत असल्याचे घटना निदर्शनास येत आहेत. अटकाव करणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण करुन जीवघेणा हल्ला करण्यापर्यंत मजल गेलेली आहे. अशीच थरारक घटना जामनेर तालुक्यातील गोद्री येथे बुधवारी (ता. ८) मध्यरात्री घडली असून, चंदन तस्करांनी शेतकऱ्यावर हल्ला (Attack) करून गंभीर जखमी केले आहे. (Deadly attack on farmers by sandalwood smugglers Jalgaon Crime News)
गोद्री येथील शेतकरी जगन कोळी हे बुधवारी (ता. ८) रात्री दोनच्या सुमारास आपल्या शेतात वीजपंप सुरू करण्यासाठी गेलेले होते. अचानक शेताच्या बांधावर नैसर्गिकरीत्या वाढलेले वीस फूट उंचीची चंदनाची झाडे कापण्याचा आवाज आला. कोळी यांना शंका आल्यावर कापत असलेल्या चोरट्यांवर आपल्याकडील बॕटरीच्या प्रकाश टाकून पाहिले, त्यावेळी दबा धरून बसलेल्या इतर चोरट्यांनी समोरून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर बॅटरीचा प्रकाश टाकून चकवा देऊन पूर्वनियोजित गोळा केलेले दगडगोटे मारणे सुरू केले. यात दगडांच्या माऱ्यामुळे शेतकऱ्याला जबर मुक्का मार लागला.
जखमी अवस्थेतील शेतकऱ्याने बॅटरीच्या प्रकाशात दोन चोरट्यांना ओळखले. आपली ओळख लपविण्यासाठी कापलेले चंदन झाड व लाकूड कापण्यासाठी वापरलेली लोखंडी करवत सोडून काही वेळातच शेतातून पसार झाले. जखमी व घाबरलेल्या अवस्थेत तस्कारांनी वापरलेले साहित्य व कापून टाकलेले साहित्य आहे त्याच स्थितीत ठेवले. आपल्यावर झालेला जीवघेणा हल्ला तसेच कापलेल्या चंदन झाडांबाबत पहूर पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या फत्तेपूर पोलिस चौकीत रीतसर तक्रार नोंदविली आहे. फत्तेपूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तस्करांनी वापरलेली करवत व कापलेल्या दोन फूट लांबीचे चंदन लाकूड ताब्यात घेण्याव्यतिरिक्त अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही.
चंदनाच्या झाडाचा सुगंध पाहण्यासाठी तस्कारांनी काही दिवसांपूर्वी खोडाला ग्रीलने एक छिद्र देखील केलेले होते. ते छिद्र आपण पाहिले मात्र याविषयी आपणास या झाडाविषयी कोणतीही माहिती नव्हती. रात्री चोरटे झाड कापत असताना हे नक्कीच महत्त्वाचे असावे, असे मला समजले. घटनेची माहिती जवळच्या फत्तेपूर पोलिस चौकी पोलिसांना कळविली आहे. मात्र, चंदन तस्करांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असे जगन कोळी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.