अमळनेर (जि. जळगाव) : तालुक्यातील एकलहरे येथील लौकी नाल्यातून बेकायदेशीर वाळू उपसा केल्यामुळे पाण्याच्या डबक्यात मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने अद्याप दोषींवर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे दोषींवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी भारतीबाई भरत कोळी यांनी प्रजासत्ताक दिनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. (death child drowning in pool of water due to illegal sand mining Mother hunger strike justice district magistrates office justice Jalgaon news)
भारती कोळी यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सुमारे दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी यांच्याकडे न्याय मिळवून देण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जांवर अद्याप कोणतेही कार्यवाही झाली नाही.
योग्य ती चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात आलेले नाही. न्याय मिळाला नाही म्हणून मला उपोषणा करावे लागत आहे. तरी संबंधितांवर कारवाई करून गुन्हे दाखल करत मला न्याय मिळावा, अशी मागणी कोळी यांनी केली आहे.
हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा
निवेदनावर राधेश्याम कोळी, किरण पाटील, सागर चौधरी, राकेश मोरे, प्रवीण भोई, विनोद कोळी, अरुण भोई, गणेश कोळी, रवींद्र कोळी, समाधान कोळी, परदेशी महाजन, भगवान कोळी, चंद्रशेखर सूर्यवंशी, सुनील शिंपी, गोकुळ बोरसे, रामराव पवार आदींच्या सह्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.