Death News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पत्नी झोपेतून उठली अन्‌ पतीचा मृतदेह दिसला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : करंज (ता. जळगाव) येथील तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकी कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. शरद जगन्नाथ पाटील (वय ३९), असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

जिल्‍हा रुग्णालयात उपस्थित नातेवाईक, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी शरद पाटील पत्नी व दोन मुलांसह करंज येथे वास्तव्याला होते.

शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्याकडे असलेल्या शेतात त्यांनी मका आणि केळीची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी सोसायटी आणि हातउसनवारीने पैसे घेतले होते. (Debt farmer Suicide by hanging An extreme step plagued by raising debt along with infertility Jalgaon)

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला ते प्रचंड त्रासले होते. बुधवारी (ता. १८) पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन मृत्यूवला कवटाळले. त्यांच्या पत्नी अनिता सकाळी उठल्यावर हा प्रकार दिसून आल्याने त्यांना धक्का बसला.

शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाइकांची मोठी गर्दी झाली होती.

त्यांच्या पश्चात पत्नी अनिता, लोकश आणि सुमीत हे दोन मुले, लहान भाऊ प्रदीप असा परिवार आहे. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT