जळगाव : परिसरात उभ्या कार पेटवून देत दहा ते पंधरा लाखांची खंडणी (Extortion) मागणाऱ्या भामट्याला तालुका पोलिसांनी यावल येथून अटक (Arrested) केली. अटकेनंतरच्या पोलिस कोठडीत रोज नवे खुलासे होत असून खंडणीसाठीच्या चिठ्ठ्या लिहणारी महिला अटकेतील संशयिताची दुसरी बायको असून दोन लग्नाच्या बायका व तिसरी एक प्रेयसी अशा तिघांचे जाबजबाव पोलिसांनी नोंदवले आहे.
चहाच्या व्यवसायात कोरोनामुळे नुकसान झाल्याने कर्जफेडसाठी खंडणीचे खूळ डोक्यात शिरल्याची माहिती समोर आली आहे. (Debt in tea business led to extortion Jalgaon Crime News)
साईविहार कॉलनीत आनंद पाटील व हरिश वरुळकर यांची कार पेटवून खंडणी मागणारा सुरेश रमेश लहासे व राजू समाधान कोळी या दोघांना तालुका पोलिसांनी अटक केली असून त्या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यावर पोलिसांचे समाधान झाले नाही म्हणून त्यांना पोलिसी खाक्या दाखविण्यात आला.
त्यानंतर सुरेश लहासे याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तो स्वतः सातवी पास असल्याने लिहिता वाचता येत नाही म्हणून त्याची दुसरी पत्नी आशा सुरेश लहासे हिनेच त्याला १० लाखांची खंडणी मागण्याच्या चिठ्ठ्या लिहून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने तालुका पोलिस ठाण्याच्या पथकातील वासुदेव मराठे, विजय पाटील यांनी आशा लहासे या संशयित महिलेस अटक करुन तिचीही पोलिस कोठडी घेतली आहे.
चहा अन् कोरोनामुळे कर्जबाजारी
सुरेश लहासे हा ॲग्रिकल्चर प्रोडक्ट तसेच विविध कंपन्यांचे शेती उपयोगी साहित्य व औषधींचे मार्केटिंग करतो. त्याच्या जिल्ह्यातील व बाहेरील मोठ्या शेतकऱ्यांशी बऱ्यापैकी ओळख्या होत्या. या ओळखीचा फायदा स्वतःचा उद्योग व्यवसाय थाटण्यासाठी करावा म्हणून त्याने चहाचा व्यवसाय सुरु केला. शेतकरी मित्रांकडून २५ लाख उसनवारी घेऊन सुरेशने स्वतःचा चहा ब्रॅण्ड लाँच केला.
मात्र, सलग दोन वर्षे लॉकडाऊन लागले आणि त्याचे नियोजन फसले. चहा तसाच पडून राहिल्याने कालबाह्य झाल्याने फेकावा लागला. पैशांची उचल केलेल्या शेतकऱ्यांनी सुरेशकडे पैशांचा तगादा लावला. त्याने दोन वेळा आत्महत्येचाही अयशस्वी प्रयत्न केला. कर्ज फेडण्यासाठी त्याच्या डोक्यात खंडणीचे खूळ शिरल्याचे त्याच्या बायको आशाबाईचे म्हणणे आहे.
सातवी पास दोन बायकांचा धनी
सुरेश लहासे हा प्रबोधनकार, नाडीपरीक्षक, मार्केटींग बॉय असून मी किमान दीडशे वर्षे जगणार असल्याचा दावा त्याने केलेला आहे.
अवघा सातवी शिकलेला असताना त्याने प्रभावी बोलण्यातून अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे, त्याचे पहिले लग्न मामाच्या मुलीशी झाले असून दुसरे लग्न आशाबाईसोबत झाले आहे. तर, तिसरी त्याच्या ऑफीसमध्ये काम करणारी तरुणी असून तिलाही त्याने नादी लावले आहे. या तिघांचा तसा जबाबही पोलिसांनी नोंदवून घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.