Jalgaon News : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या बांबरुड (राणीचे) येथील उपकेंद्रात आरोग्य सेवक म्हणून नियुक्ती झालेले कर्मचारी दिगंबर वाघ हे तब्बल दिड वर्षांपासून हजर झालेले नाहीत.
त्यांचा पगार मात्र या आरोग्य केंद्रातून नियमितपणे अदा केला जात असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. ( Despite being appointed health worker is absent for one and half years jalgaon news )
यावर संबंधित वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोग्य सेवक दिलीप वाघ हे शिपाई म्हणून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या बंगल्यावर कार्यरत होते.
सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची पदोन्नती होऊन त्यांची बांबरुड (राणीचे) येथे नियुक्ती झाली. या नियुक्तीला दीड वर्षे होऊनही ते अद्याप नियुक्तीच्या ठिकाणी हजरच झालेले नाहीत. ते आजही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याच बंगल्यावर कार्यरत आहेत.
एकीकडे येथील आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक, सेविकांच्या अनेक जागा रिक्त असताना ज्यांची येथे नियुक्ती झाली आहे, असे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे आपल्या कामावर हजर नसतात. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना आरोग्याच्या सेवांपासून वंचित राहावे लागत आहे.
या संदर्भात प्रभारी तालुका अधिकारी डॉ. शेखर पाटील यांना विचारणा केली असता, बांबरुड (राणीचे) येथील कर्मचारी दिगंबर वाघ यांच्या नियुक्तीबद्दल काही माहिती नाही. तक्रारीच्या अनुषंगाने हा विषय वरिष्ठांना कळवून योग्य तो निर्णय ते घेतील असे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
''येथील आरोग्य सेवक पद हे रिक्तच आहे.या पदावर कोणाची नियुक्ती झाली.किंवा तो कर्मचारी दिगंबर वाघ हा कुठे व कसा काम करतो याची जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी चौकशी करून तो कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी हजर करून बांबरुड राणीचे येथील काम न करता घेतलेला पगार वसुल करावा.''-उपसरपंच प्रदीप वाघ, बांबरुड (राणीचे)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.