Devgiri short film festival  esakal
जळगाव

Devgiri short film fest : जळगावला 27 पासून देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल

हा फेस्टिवल २७ व २८ जानेवारीला होत असून यात ६० चित्रपट प्रदर्शित केले जाणार असल्याची माहिती संयोजक शोभा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ वृत्तसेवा

Devgiri short film fest : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेचे खाशाबा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जळगाव यांच्या विद्यमाने तिसरा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे.

हा फेस्टिवल २७ व २८ जानेवारीला होत असून यात ६० चित्रपट प्रदर्शित केले जाणार असल्याची माहिती संयोजक शोभा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Devagiri Short Film Festival in Jalgaon from 27 news)

विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे झालेल्या पत्रपरिषदेत सचिव डॉ. रत्नाकर गोरे, विनीत जोशी, किरण सोहळे, प्राचार्य डॉ. किशोर पाठक उपस्थित होते. दोन दिवसीय फेस्टिवल जळगावातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे होणार आहे.

चित्रपट विषयक प्रदर्शनी, शॉर्ट फिल्म स्क्रीनिंग, मास्टर क्लास, चर्चासत्र, ओपन फोरम, टुरिंग टॉकीज तसेच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव रंगणार आहे.

खानदेश व मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातून या महोत्सवासाठी १०० हून अधिक शॉर्टफिल्म आल्या. परिक्षकांमार्फत परिक्षण करून यातील निवडक ६० शॉर्ट फिल्मचे प्रदर्शन दोन दिवसीय महोत्सवात करण्यात येणार आहे.

महोत्सवानिमित्ताने चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक युवा कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण परिसराला चित्रतपस्वी भालजी पेंढारकर चित्रनगरी असे नाव देण्यात आले आहे. तर स्क्रिनींग सभागृहांना पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे व पद्मश्री ना. धों. महानोर यांचे नाव देण्यात आले आहे.

'बिसाउ कि मुक रामायण'च्या प्रदर्शनाने सुरुवात

महोत्सवाची ओपनिंग फिल्म 'बिसाउ कि मुक रामायण' हे २७ जानेवारीला सकाळी ९ वाजता डॉ. प्रभा अत्रे सभागृहात प्रदर्शित करण्यात येईल. यानंतर महोत्सवात सहभागी निवडक ६० चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

दुपार सत्रात 'चित्रपट रसग्रहण' या विषयावर भारतीय चित्र साधनाचे राष्ट्रीय सचिव, चित्रपट अभ्यासक अतुल गंगवार (दिल्ली) यांचा मास्टर क्लास होईल. तर तरुणांसाठी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील (पुणे) यांचा 'कथा निवड व दिग्दर्शन' या विषयावर मास्टर क्लास होईल.

सायंकाळी साडेचारला कुलगुरू डॉ. व्हि. एल. माहेश्वरी, अशोक जैन, डॉ. भरत अमळकर, चित्रपट अभ्यासक अतुल गंगवार, अभिनेत्री सुरभी हांडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल.

सायंकाळी सातला टुरींग टॉकीज सत्रात लहान मुलांचे भावविश्व समृद्ध करणारा चित्र आर्या द डॉटर ऑफ भारत'चे प्रदर्शन तसेच निर्माता दिग्दर्शक यांचेशी खुला संवाद होइल.

दुसऱ्या दिवशी २८ जानेवारीला फिल्म स्क्रिनींगसह दिग्दर्शक नितीन भास्कर आणि निर्माता शरद पाटील यांचा युवा फिल्म मेकर्ससाठी मास्टर क्लास.

दुपार सत्रात ओपन फोरम सत्रात सुप्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे युवकांना मार्गदर्शन करतील. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्षाचे औचित्य साधून चित्र तपस्वी भालजी पेंढारकर दिग्दर्शित मराठा तितुका मेळवावा हि महोत्सवाची क्लोजिंग फिल्म प्रदर्शित केली जाईल.

संध्याकाळी ५ वाजता महोत्सवाचा समारोप होईल. याप्रसंगी रा.स्व. संघाचे प्रांत सहकार्यवाह स्वानंद झारे, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, प्र. कुलगुरू डॉ. एस.टी. इंगळे, उद्योजक प्रकाश चौबे, अॅड. सुशील अत्रे उपस्थित राहणार आहे. यात उत्कृष्ट प्रथम तीन शॉर्ट फिल्मला बक्षीस दिले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICSE, ISC Exam Schedule: दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; 'असं' डाऊनलोड करा

IPL 2025 Mega Auction Live Streaming: अर्जुन तेंडुलकर आता मुंबई इंडियन्सला नकोसा झाला, ३० लाखांतही कोणी बोली नाही लावली

Koregaon Bhima News : कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर उद्या अंतिम युक्तिवाद

Porsche Car Accident : आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा अर्ज दाखल

Vaibhav Suryavanshi IPL Auction: नावातच 'वैभव'! १३ व्या वर्षी सूर्यवंशी झाला करोडपती; द्रविडच्या मार्गदर्शनाखाली RR कडून खेळणार

SCROLL FOR NEXT