thief esakal
जळगाव

Jalgaon Crime News : श्रीराम रथोत्सवात चोरट्यांची चांदी; मंगळसूत्रांसह मोबाईल, पर्स चोरीला

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील श्रीराम रथोत्सवात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या खिशातील मोबाईल, पर्स, गळ्यातील मंगलपोत चोरीला गेल्याच्या घटना गुरुवार (ता.२३) रोजी घडल्या.

या प्रकरणी तब्बल सहा ते आठ तक्रारी दाखल झाल्या असून काहींनी तक्रारही दिल्या नसल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.(devotees Mobile wallet stolen in shri ram rathotsav jalgaon crime news)

ग्रामदैवत विठ्ठलमंदिर संस्थानातर्फे दरवर्षीप्रमाणे रथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. शतकपुर्व परंपरा असलेल्या या रथोत्सवासाठी जळगाव उपविभागातील सर्व प्रभारी, उपनिरीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकारी, अप्पर अधीक्षकासह फौजफाटा बंदोबस्ताला तैनात करण्यात येतो.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होवू नये, अप्रिय घटना घडू नये भाविकांच्या मालमत्तेचे व जीविताचे रक्षण व्हावे यासाठी पोलिसांचा खडा पहारा लावण्यात येत असताना पोलिस बंदोबस्तात चोरटे आपले काम फत्तेकरुन पोबारा होतात.

यंदाच्या रथोत्सवात मोबाईल, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, पर्स, पाकीट आणि खिशातील रोख रक्कम चोरीला गेल्याच्या असंख्य घटना समोर आल्या असल्या तरी सहा तक्रारदारांची एकमेव फिर्याद शहर पोलिसांनी नोंदवून घेतली.

काही तक्रारदार पोलिस ठाण्यात पोचलेही शहर पोलिसांनी घटनास्थळ विचारून शनिपेठ रवाना केले तर काही भाविकांनी थेट घरचा रस्ता धरल्याने गुन्हेच दाखल होवु शकलेले नाहीत.

४ गुन्ह्यांची एकच फिर्याद

- गुन्हा १) दिनकरनगर आसोदा रोड येथील पूनम भूषण कोळी (वय २३) या रथदर्शनाला आल्या असताना त्याच्या गळ्यातील १ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केले.

- गुन्हा २) माधुरी पवन बाविस्कर (वय २५, रा.कानळदा रोड) यांच्या गळ्यातील ३ ग्रॅमचे मणी-मंगळसूत्र

- गुन्हा३) तनुजा रवींद्र भोई (वय ३०, रा.रामेश्वर कॉलनी) यांच्या गळ्यातील २ ग्रॅम वाट्या, १ ग्रॅम मणी मंगळसूत्र

- गुन्हा ४) सीमा प्रशांत पाटील (वय ३७, रा. इंद्रप्रस्थ नगर, दुधफेडरेशन जवळ) यांच्या गळ्यातील ३ ग्रॅमच्या दोन वाट्या ४ सोन्याचे मणी असे मंगळसूत्र तोडून नेले. या एकत्रित फिर्यादीवरून दाखल गुन्ह्याचा पोलिस नाईक प्रफुल्ल धांडे तपास करीत आहेत.

वृद्धाचा मोबाईल लंपास

जळगाव : शहरातील महाबळ रोड मायादेवी नगरातील रहिवासी मकरंद पुरुषोत्तम पाठक (वय ६१) हे दाणाबाजारात रथाचे दर्शन घेताना त्यांच्या हातातील २८ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी झटका देवून हिसकावून नेला.

शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक राजकुमार चव्हाण तपास करीत आहेत. यासह इतर भाविकांनीही मोबाईल चेारीबाबत शहर आणि शनिपेठ पोलिसांत संपर्क केला असता काहींच्या कच्चा तक्रारी घेण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT