Bribe Crime esakal
जळगाव

Dhule Bribe Crime : जप्त ट्रॅक्टर सोडविण्यासाठी लाच घेणारा शिपाई जाळ्यात! धुळे शहर अपर तहसील कार्यालयातील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

Dhule Bribe Crime : गौण खनिज वाहतुकीचे जप्त ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना धुळे शहर अपर तहसील कार्यालयातील शिपायाला पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने सोमवारी (ता.२४) सायंकाळी ही कारवाई केली. नारायण पोपट फुलपगारे असे लाचखोर शिपायाचे नाव आहे. लाचेची रक्कम फोन-पेद्वारे घेताना तो एसीबीच्या जाळ्यात अडकला. त्याच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (Dhule Crime Bribe taking constable arrested)

तक्रारदाराचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय आहे. ते ट्रॅक्टरने शहरालगत वडेल रोड-वलवाडी परिसरात २५ नोव्हेंबर २०२२ ला वाळू वाहतूक करत होते. देवपूर (वलवाडी) तलाठ्याने ट्रॅक्टरचा पंचनामा करून शहर अपर तहसील कार्यालयाच्या आवारात ट्रॅक्टर जमा करून तक्रारदाराला एक लाख ३० हजार ५०० रुपये दंडाची नोटीस दिली.

दंडाची रक्कम तक्रारदाराने ६ जून २०२४ ला चलनाद्वारे बँकेत भरली. चलन पावती अपर तहसील कार्यालयात जमा केली. नंतर तक्रारदार ट्रॅक्टर ताब्यात घेण्यासाठी अपर तहसील कार्यालयात गेला असता त्यांची कार्यालयातील शिपाई नारायण फुलपगारे याच्याशी भेट झाली. त्याने तक्रारदाराकडे ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. (latest marathi news)

या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात सात जूनला तक्रार केली. याअनुषंगाने त्याच दिवशी पंचांसमक्ष पडताळणी केली असता शिपाई फुलपगारे याने तक्रारदाराचे ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी तडजोडीअंती दोन हजारांच्या लाचेची मागणी केली.

सोमवारी (ता.२४) सायंकाळी तक्रारदाराने पंचासमक्ष शिपाई फुलपगारे याची भेट घेतली असता त्याला दोन हजारांच्या लाचेची रक्कम फोन-पेद्वारे दिली. ती स्वीकारताना शिपायाला पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे येथील पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागूल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nithin Kamath: भारतीय लोक श्रीमंतांचा द्वेष का करतात? नितीन कामथ यांनी सांगितलं कारण; म्हणाले, आपला समाज...

पुणे सोलापूर महामार्गावर विश्रांतीसाठी थांबलेल्या वाहनातील डिझेल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

"ती गृहिणी म्हणजे तिला किंमत नाही हे चुकीचं" नवरात्रीनिमित्त स्नेहल तरडे यांचं डोळ्यात अंजन घालणारं वक्तव्य

धक्कादायक घटना! CM एकनाथ शिंदेंच्या बंदोबस्ताला जाताना मोठा अपघात, १२ पोलीस जखमी

Fake SBI Branch: बनावट बँक शाखेचा भांडाफोड; SBIच्या नावे गावकऱ्यांची फसवणूक, लाखो रुपयांना गंडा

SCROLL FOR NEXT