Dr. Subhash Bhamre, Dr. Shobha Bacchav  esakal
जळगाव

Dhule Lok Sabha Constituency : काँग्रेसपुढे बुथ रचनेचे आव्हान; सत्ताधारी भाजपशी मुकाबला करताना नियोजनाची कसोटी

Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपने बुथ रचना `स्ट्राँग` करण्यास सुरूवात केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपने बुथ रचना `स्ट्राँग` करण्यास सुरूवात केली. प्रशिक्षण, बुथप्रमुखांचे मेळावे आणि मंडल अध्यक्षांकडे विविध जबाबदारी सोपवत भाजपने निवडणूकपूर्व नियोजनासह रचनात्मक कार्यावर भर दिला. याउलट काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांना बुथ रचनेवर भर देण्याचे आवाहन नेत्यांनी केल्याचे दिसून आले. (Dhule Lok Sabha Constituency)

परंतु, दोन विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित मतदारसंघात काँग्रेसची बुथ रचना विस्कळीत असल्याने ती बळकट करण्याचे मोठे आव्हान असल्याचे अनेक कार्यकर्तेच बोलतात. निवडणुकीत बुथ रचनेला महत्त्व आहे. ते लक्षात घेत सत्ताधारी भाजपने बुथला शक्ती केंद्र असे मानून निवडणूकपूर्व काम सुरू केले.

पक्षातील ज्येष्ठ नेत्याची लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करत त्यास बुथ रचना `स्ट्राँग` करण्याचे कामकाज सोपविले गेले. यादृष्टीने बुथ प्रमुखांचे मेळावे, त्यांना प्रशिक्षण, मंडल अध्यक्षांसह विविध पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करत भाजपने निवडणुकीच्या तयारीसाठी आघाडी घेतली.

बुथ रचनेचा प्रश्‍न

लोकसभेच्या धुळे मतदारसंघात पदाधिकाऱ्यांनी बुथ रचना बळकट करावी, असे काँग्रेस नेत्यांकडून वेळोवेळी आवाहन झाल्याचे दिसून आले. थोडे फार कामकाजही झाले असेल. परंतु, भाजपच्या तुलनेत काँग्रेसची बुथ रचना विस्कळीत असल्याची चर्चा अनेक कार्यकर्त्यांमध्ये घडताना दिसून येते. (latest marathi news)

काँग्रेसचे नेते आमदार कुणाल पाटील यांचा धुळे ग्रामीण मतदारसंघ, काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्‍याम सनेर यांचा शिंदखेडा मतदारसंघ वगळला तर धुळे शहर, मालेगाव शहर (मध्य), मालेगाव ग्रामीण (बाह्य), बागलाण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची बुथ रचना किती `स्ट्राँग` आहे याची मतदानापूर्वी नेत्यांनी एकदा पडताळणी करावी, असे कार्यकर्ते आपापसात कुजबुजतात.

डावपेचांकडे लक्ष

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ भाजप, धुळे शहर एमआयएम, धुळे ग्रामीण काँग्रेस, मालेगाव मध्य एमआयएम, मालेगाव बाह्य भाजपशी घरोबा झालेला शिवसेनेचा शिंदे गट, तर बागलाण विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघ वगळता काँग्रेसचा गेल्या पाच वर्षांतील इतर पाच विधानसभा मतदारसंघातील प्रभावाचा आलेख तपासला तर काँग्रेसपुढे बुथ रचना आणि कार्यकर्त्यांच्या नेमणुकीचे मोठे आव्हान असेल.

शिवाय उमेदवारी मिळण्यावरून काँग्रेसमध्ये इच्छुक निष्ठावंत विरूध्द मतदारसंघाच्या बाहेरचा इच्छुक उमेदवार, असा संघर्ष चालल्याने कार्यकर्ते संभ्रमात सापडले. नंतर या वादावर पडदा टाकण्यात आल्यानंतर काँग्रेसने उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना संधी देत प्रचारास सुरूवात केली आहे. मुस्लीमबहुल व इतर भागातील मतदारांवर या पक्षाची भिस्त असताना, सत्ताधारी भाजपशी मुकाबला करताना काँग्रेसकडून काय- काय डावपेच अंमलात आणले जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT