हळद पिक sakal
जळगाव

शिरपूर : जैन बनले हळद पिकाचे ‘आगार’!

हळद लागवडीकडे वाढता कल; सिंचन सुविधा वाढल्याचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : गत दोन ते तीन वर्षांपासून शिरपूर व परिसरामध्ये हळद पिकाकडे मोठ्या प्रमाणावर शेतकरी वळले आहेत. वाढते पर्जन्यमान व वाढत्या सिंचन सुविधांमुळे शिरपूर जैन हे हळद पिकाचे आगार बनले आहे.

पूर्वी शिरपूर जैन हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ व विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध होते. विदर्भामध्ये विदर्भाच्या बाहेर सुद्धा येथून विड्याच्या पानांची विक्री व्हायची. मात्र काळाच्या ओघामध्ये येथील पानमळ्याची शेती कालबाह्य झाली आहे.

शिरपूर जैन व परिसरामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काही मोजकेच प्रगतिशील शेतकरी हळद पिकाची लागवड करून उत्पादन घेत होते ।मात्र गत दोन-तीन वर्षापासून शिरपूर व परिसरामध्ये जवळपास दोन हजार एकरावर हळदीची लागवड होत आहे. वाशीम जिल्ह्यामध्ये हळद उत्पादनामध्ये आता शिरपूर चा पहिला क्रमांक लागतो. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याकडे हळद पीक घेतले जाते. मोठ्या प्रमाणावर हळद उत्पादन घेणारे शेतकरी असल्याने अनेक खाजगी कंपन्या मार्गदर्शन शिबिर आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात .ठिबक सिंचन व बेड पद्धतीने हळद लागवड करण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. या परिसरामध्ये मिर्जापुर लघुसिंचन प्रकल्प कार्यान्वित झाल्याने जवळपास दोन हजार एकर जमीन सिंचनाखाली आली आहे.

मोठ्या प्रमाणावर सिंचन सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. एकरी ३० ते ४० क्विंटलपर्यंत शेतकरी उत्पादन घेत आहेत. येथे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार समिती कार्यरत आहे. मात्र या ठिकाणी हळदीची बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना इतर बाजारपेठेमध्ये हळद विक्री करावी लागते एकूणच शिरपूर जैन हे आता हळद पिकाचे आगार बनले आहे. त्यामुळे शासनस्तरावरून हळद उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी विक्री ,बाजारपेठ व इतर सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त होत आहेत.

मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पामुळे पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. व इaतर पिकांच्या तुलनेत चांगले उत्पन्न व नफा मिळत असल्याने मी सहा एकर हळद लागवड केली आहे .

- संजय देशमुख ,प्रगतशील शेतकरी शिरपूर

मी यावर्षी आठ एकर हळद लावली आहे. शिरपूर व परिसरामध्ये हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. येथे बाजारपेठ उपलब्ध नाही बाजार समितीने बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

- विलास दिलीपराव देशमुख, हळद उत्पादक शेतकरी, शिरपूर

गत दोन-तीन वर्षापासून शिरपूर येथे हळदीचे उत्पादन वाढले आहे. हळद खरेदी करण्यासाठी बाहेरून येथे व्यापारी येतात. येथील शेतकऱ्यांना रिसोड ,वाशीम ,हिंगोली व इतर बाजारपेठेमध्ये हळद विक्री करावी लागते .शिरपूर उपबाजार समितीने हळद विक्रीची सुविधा उपलब्ध करावी तसेच माल साठवण्याची व्यवस्था केल्यास हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल .

- नंदकिशोर उल्हामाले, हळद उत्पादक शेतकरी शिरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT