'Chatbot', 'QR Code' to clear doubts esakal
जळगाव

Amalner Marathi Sahitya Smmelan : यंदा मराठी साहित्य संमेलनाला मिळणार ‘डिजिटल टच’

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यंदा आयोजकांकडून डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर ता. ११ (जि.जळगाव) : अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यंदा आयोजकांकडून डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करण्यात येत आहे.

मराठी साहित्य संमेलनाच्या पारंपारिक परंपरेला यंदा डिजिटल टच देण्यात आला आहे. साहित्य संमेलनाशी निगडित प्रश्न व शंकांचे निरसन करण्यासाठी प्रथमचचॅटबॉट’, ‘क्यूआर कोड’ सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे.(Digital technology is being fully used in Amalner Marathi literature conference this year jalgaon news)

या प्रणालीच्या माध्यमातून व्हॉट्सॲपवर संमेलनाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. याशिवाय संमेलनाच्या प्रसिध्दीसाठी रिल्स, व्हिडीओ व सोशल मीडियाचाही प्रभावीपणे वापरण्यात येत आहे. त्यामुळे संमेलनात सहभागी होण्यापासून संमेलनस्थळी पोचल्यानंतर सर्वांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे व्हाट्सअॅपच्या माध्यमातून मोबाईलवर मिळणार आहेत.

चॅटबॉट कसे काम करणार

संमेलनाशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ९५२९२१६३५५ हा मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागेल. या क्रमांकवर नमस्कार, हाय किंवा हॅलो असा मेसेज केल्यानंतर तुम्हाला, ‘नमस्कार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२३ च्या चॅटबॉटवर तुमचे हार्दिक स्वागत आहे.

कृपया खालील पर्यांयापैकी योग्य पर्याय निवडा.’ असा मेसेज येईल. त्यात खाली दिलेल्या मेनूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला साहित्य संमेलनाशी निगडित प्रश्नांची यादी दिसेल. त्यापैकी कोणताही प्रश्न निवडल्यास त्याचे उत्तर तत्काळ तुमच्या मोबाईलवर पाठविण्यात येईल.

यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, ‘चॅट बॉट’च्या माध्यमातून संमेलनाचे संकेतस्थळ, प्रतिनिधी व ग्रंथदालन नोंदणी, निवास व्यवस्था, भोजनाचा मेनू, तसेच चार दिवसांत होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती मिळणार आहे.

याशिवाय संमेलनस्थळी कसे पोहचावे0 संपर्क कुणाशी करावा0 याची माहिती व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. ज्यांना चॅटबॉटचा मोबाईल क्रमांक माहित नसेल त्यांना ‘लिंक’ किंवा व ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून देखील ‘चॅट बॉट’चा वापर करता येणार आहे.

"९७ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वांना यात जोडण्याचा प्रयत्न आहे. युवावर्गाला देखील संमेलनात सहभागी करुन घेण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात असून त्यात तरुणाईकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे." - डॉ.अविनाश जोशी (अध्यक्ष, मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT