suresh bhole & Nitin Laddha esakal
जळगाव

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांसमोर नेत्यांमध्ये कलगीतुरा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मी शहराचा आमदार (MLA) आहे, शहरात अनेक भागातील रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत, नालेसफाई झालेली नाही. रिंग रोड परिसरात मी राहतो म्हणून नालेसफाई झाली नाही. या परिसरातील नागरिक टॅक्स भरतात. शहरात रस्त्यांची कामे बाकी आहे. त्यात अनेक कामे निकृष्ट दर्जाची आहेत. त्या कामांची चौकशी केल्यानंतरच पेमेंट द्या, अशी मागणी आमदार सुरेश भोळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning Committee) बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. तर माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी त्यांच्यावर पलटवार करीत मामाही या शहराचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी केवळ हायमास्ट दिवे लावणे, पेव्हर ब्लॉक बसविणे अशी कामे न करता शहरातील रस्त्यांसाठी आमदार फंडातून निधी द्यावा, असे सांगितले. (dispute among leaders in front of Guardian Minister in meeting of District Planning Committee Jalgaon News)

महापालिकेचे अधिकारी फोन घेत नाहीत
आमदार भोळे म्हणाले, की शहराच्या वाढीव वस्तीत अद्यापही पाणीपुरवठा होत नाही. आयुक्त येथे बसलेले आहेत त्यांना पालकमंत्री पाटील यांनी सूचना करावी की वाढीव वस्तीत पाणीपुरवठ्याची व्यवस्था करा. मी लोकप्रतिनिधी असल्याने मला महापालिकेच्या अधिकाऱ्यांची माहिती मिळाली पाहिजे. माझे फोनही महापालिकेचे अधिकारी घेत नाही. महापालिका व वीज कंपनी यांच्या समन्वय नसल्याने वारंवार वीज खंडित होते. अनेक ठिकाणी तारांना अडणाऱ्या फांद्या तोडल्या मात्र त्या उचलल्या गेल्या नाही. तासन्‌तास वीज पुरवठा खंडित होतो. नागरिक आम्हाला फोन करतात. महापालिकेचे अधिकारी समन्वय ठेवत नाही. रिंग रोडची नालेसफाई हेतुपुरस्सर करण्यात आलेली नाही. शहराला दूषित पाणीपुरवठा होतो मात्र ते शुद्धीकरणासाठी पुढाकार कोणी घेत नाही. यावर पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना समज देत आमदार भोळे सांगतील तसे करा, तेही लोकप्रतिनिधी आहेत याचा विसर पडता कामा नये, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT