While distributing Aadhaar Kathi, Ravindra Patil, Dr. Villagers with Prithviraj Patil. 
जळगाव

Jalgaon News: टोळी येथील ज्येष्ठांना आधारकाठी! वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्ताने राबवला अनोखा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News: टोळी (ता. पारोळा) येथे श्री छत्रपती प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र पाटील यांनी आपले वडील स्वर्गीय जमनादास श्रीधर पाटील यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्ताने श्री छत्रपती प्रतिष्ठान टोळीच्या माध्यमातून गावातील ५१ ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांना वडिलांची आठवण म्हणून आधारकाठीचे वाटप केले. (Distribution of Aadhaar Kathi to 51 senior citizens in memory of their fathers jalgaon news)

म्हातारपणी चालताना प्रत्येकालाच काठीचा आधार घेऊन पाऊल टाकावे लागते. आपल्या वडिलांच्या स्मृति जपल्या जाव्यात, यासाठी हा एक चांगला व समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांना श्रद्धांजली वाहिल्याची भावना दिल्याचे आदर्श उदाहरण जनतेसमोर ठेवल्याची भावना श्री छत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पृथ्वीराज पाटील यांनी बोलून दाखवली.

काठीवाटपाच्या कार्यक्रमात रवींद्र पाटील यांनी स्वतः आपल्या नाशिकमधील वेल्डिंग वर्कशॉप मध्ये या काठ्या बनवून वडिलांची आठवण म्हणून ज्येष्ठ नागरिकांना दिल्याचे डॉ. पाटील यांनी सांगून इतरांनी देखील असा आदर्शन घेऊन आपल्या प्रियजनांचा स्मृतिदिन साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरहून आलेले टोळी गावाचे सुपुत्र व संत कबीर महाविद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. पवार अध्यक्षस्थानी होते.

त्यांनी अध्यक्षीय भाषणात रवींद्र पाटील यांनी गावातील वयोवृद्ध आई-वडिलांसमान असणाऱ्या ५१ ग्रामस्थांना आधारकाठी देऊन त्या सर्वांमध्ये आपल्या वडिलांना पाहायचे स्वप्न पूर्ण केल्याची भावना बोलून दाखवली.

या काठीची किंमत कदाचित १५० ते २०० रुपये असेल. मात्र, या ठिकाणी किमंत गौण ठरते कारण त्या काठीत मायेची भावना ओतपोत भरलेली आहे. जे लाखो रुपये खर्च करूनही त्याची बरोबरी करु शकत नाही.

या कार्यक्रमात मला सहभागी होता आले, हे मी माझे भाग्य समजतो व आजपर्यंत मी आई, वडील व बहिणीच्या स्मृतिप्रित्यर्थ अनेक कार्यक्रम आयोजित केले. मात्र, कर्मभूमीतील या कार्यक्रमामुळे मला देखील जन्मभूमीत कार्यक्रम करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना श्री. पवार यांनी बोलून दाखवली.

प्रमुख पाहुणे सुभाष पाटील (बदलापूर) यांनी आपण पैशांनी किती श्रीमंत आहात, यापेक्षा मनाने किती समृद्ध आहात हे रवींद्र पाटील यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिल्याचे सांगितले. टोळीच्या पोलिस पाटील नलिनी पाटील यांनी श्री छत्रपती प्रतिष्ठानतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले. यशस्वितेसाठी विश्वास पाटील यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT