जळगाव : जिल्हा दूध उत्पादक संघातील दूध भुकटी व लोणी गैरव्यवहार प्रकरणात दाखल गुन्ह्यात महेंद्र नारायण केदार यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
जिल्हा दूध उत्पादक संघातील विक्री विभागातील जबाबदार कर्मचारी, अधिकाऱ्यांनी संगनमत करून १४ टन बटर आणि ९ टन दूध पावडरच्या खोट्या नोंदी करून १ कोटी १५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात १३ ऑक्टोबरला अनंत अंबीकर, महेंद्र केदार यांच्यासह कामगार ठेक्यांतर्गत सहाय्यक सुनील चव्हाण व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (District and Sessions Court has granted pre arrest bail to Mahendra Narayan Kedar in case of District Milk Producers Association Jalgaon News)
हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली
तपासाधिकारी तथा तक्रारदार सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी यांनी संशयितांचे अटकसत्र राबवून गुन्ह्याशी निगडित पुरावे संकलीत केले होते. महेंद्र केदार यांच्यातर्फे १८ ऑक्टोबरला अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
न्यायाधीश माने यांच्या न्यायालयात तक्रारदार, फिर्यादी आणि तपासाधिकाऱ्यांचे म्हणणे, जामीन नाकारण्याचे कारणांवर प्रदीर्घ युक्तिवाद होऊन न्यायालयाने महेंद्र केदार यांचा जामीन अर्ज मंजूर केला. केदार यांच्यातर्फे ॲड. सागर चित्रे, ॲड. सचिन वर्मा यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.