Officers of the District Bank during the confiscation operation at the office of Mahaveer Credit Union in Navi Peth. esakal
जळगाव

Jalgaon News : महावीर पतसंस्थेच्या संचालकांवर जिल्हा बँकेची कर्जवसुलीची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव जिल्हा बँकेने महावीर पतसंस्थेला आठ कोटी रुपये कर्ज दिले होते. मात्र त्याची परतफेड न केल्याने व्याजासह ही रक्कम ३१ कोटी २८ लाख रुपये झाली आहे. त्याच्या वसुलीसाठी आता जिल्हा बँकेने पतसंस्थेच्या संचालकांच्या घरावर जप्तीची नोटीस चिकटवली आहे. (District Bank loan recovery action against directors of Mahaveer Credit Union jalgaon news)

जळगाव जिल्हा बँकेने २००२ मध्ये महावीर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रिडीट सोसायटी या पतसंस्थेला आठ कोटी रुपये कर्ज दिले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेने पतपेढीला अनेक पत्र दिले, परंतु त्यानंतर संचालक मंडळाने कर्जफेड केली नाही. त्यानंतर जिल्हा बँकेने पतसंस्थेला एकरकमी परतफेड योजना (ओसीएस) सुविधा दिल्यावरही कर्जफेड झाली नाही.

जिल्हा बँकेने २०१९ मध्ये सहकार न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने सहकार कायदा १९६० चे कलम ९८ (ब) अन्वये बँकेला वसुली प्रमाणपत्र देवून जप्तीचे अधिकार दिले. त्यानुसार आता बँकेतर्फे कर्जवसुलीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्या अंतर्गत सोमवारी (ता. ३०) जिल्हा बँकेने महावीर पतसंस्थेच्या संचालकांच्या घरी कर्जवसुलीच्या नोटीस चिकटवल्या आहेत.

पतसंस्थेचे संचालक सुरेंद्र लुंकड, सुभाष सांखला, तुळशीराम बारी, सुरेश टाटीया, सौ.अपना राका, सुरेश बन्सीलाल जैन, महेंद्र शहा, अजित कुचेरिया यांच्या निवासस्थानी, तर महावीर पतसंस्थेच्या नवी पेठेतील कार्यालयात अध्यक्षांच्या कार्यालयात जप्तीची कारवाई करण्यात आली. बँकेचे विशेष वसुली अधिकारी मयूर पाटील, बिगरशेती कर्ज विभागाचे सरव्यवस्थापक प्रल्हाद सपकाळे, वसुली विभागाचे सरव्यवस्थापक मंगलसिंग सोनवणे, सर्व व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

लिलावाची कारवाई करणार

संचालकाच्या निवासस्थानावर जप्तीची धडक कारवाई केल्यानंतर आता नियमाप्रमाणे जप्ती नोटीस दिलेल्या संचालकाच्या घरांची लिलावाची कारवाई करण्यात येईल. जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT