Collector Ayush Prasad while guiding the journalists. dignitaries on the platform. esakal
जळगाव

Jalgaon News : पत्रकारितेची विश्वासार्हता जपण्यासाठी लेखणी झिजवा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

पत्रकारांनी सत्याची चाड धरुन पत्रकारितेची विश्वासार्हता जपण्यासाठी लेखणी झिजवली पाहिजे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘प्रशासन आणि पत्रकारिता’ या विषयावर बोलताना व्यक्त केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पत्रकारांनी सत्याची चाड धरुन पत्रकारितेची विश्वासार्हता जपण्यासाठी लेखणी झिजवली पाहिजे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘प्रशासन आणि पत्रकारिता’ या विषयावर बोलताना व्यक्त केली. (District Collector Ayush Prasad statement of should use his pen to preserve credibility of journalism jalgaon news)

जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पत्रकार संघ विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील होते. तर व्यासपीठावर कार्यवाह अशोक भाटिया,ज्येष्ठ पत्रकार कमलाकर वाणी, अजित नांदेडकर, मनोज बारी, प्रमोद पाटील, भिकाभाऊ चौधरी, सचिन सोमवंशी, लेखराज उपाध्याय, देविदास वाणी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, की प्रशासन व पत्रकारिता यांनी विधायकदृष्टी ठेवून काम केले तर जिल्ह्यातील अनेक समाजहितोपयोगी प्रकल्प मार्गी लागू शकतात. पत्रकार म्हणून काम करणे ही तारेवरची कसरत आहे.

सत्य जनतेसमोर मांडण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे.जनमताचा कल लक्षात घेऊन पत्रकारिता केली पाहिजे. सोशल मीडियाला पत्रकारिता म्हणता येणार नाही. पत्रकार संघाच्या हीरक महोत्सवी वर्षात जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सहकार्य करेल.

मंत्रालय व विधिमंडळ पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य कमलाकर वाणी यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर सुरु असलेल्या प्रयत्नाची माहिती दिली. श्री घोरपडे यांनी ‘कालच्या आणि आजच्या’ पत्रकारितेत फार मोठी दरी निर्माण झाल्याची खंत मांडली. आमदार राजूमामा भोळे यांनीही पत्रकारांना शुभेच्छा देतांना, विकासात्मक पत्रकारितेवर भर देण्याचे आवाहन केले.

गुणवंताचा सत्कार

यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रोझमीन खिमाणी, संदीप महाजन, संजय निकुंभ, डॉ.बाळासाहेब कुमावत, सुरेश सानप, बी.एन.चौधरी, शब्बीर सय्यद आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा होऊन त्यात, पत्रकार संघाचा हिरक महोत्सव विविध उपक्रम राबवून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिलीप शिरुडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT