District Milk Union esakal
जळगाव

District Milk Union Election : अंतिम मतदार यादी जाहीर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी ४४१ मतदारांची अंतिम यादी आज (ता.१८) जाहीर करण्यात आली आहे. आता दहा ते वीस दिवसाच्या कालावधीत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. यात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, दूध संघाच्या विद्यमान चेअरमन मंदाकिनी खडसे व जिल्हा दूध संघाचे माजी प्रशासक व गैरव्यवहाराची तक्रार करणारे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांचा सामावेश आहे.

जिल्हा दूध संघ निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नाशिक विभागीय उपनिबंधक (सहकार) यांच्यातर्फे आज संचालकपदासाठी मतदारांची यादी जाहीर करण्यात आली. यापूर्वी काही मतदारांवर घेतलेल्या सर्व हरकती फेटाळण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतिम यादीचीच प्रतिक्षा होती. नाशिक विभागीय उपनिबंधक (सहकार) यांच्या कार्यालयात ही यादी सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध करण्यात आली. निवडणुकीसाठी आता ४४१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.(District Milk Union Election Final list of voter announced Jalgaon News)

दिग्गज नेतेही मतदार

जिल्हा दूध संघाच्या मतदार यादीत जिल्ह्यातील दिग्गज नेते आहेत. यात पालकमंत्री गुलाबराव रघुनाथ पाटील (वडली संस्था, ता. जळगाव)येथून मतदार आहेत. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश दत्तात्रेय महाजन (विठ्ठल रुक्मिणी संस्था, शेंदुर्णी ता. जामनेर), संघाच्या विद्यमान चेअरमन मंदाकिनी खडसे (मुक्ताई संस्था, कोथळी), आमदार मंगेश चव्हाण (पिंपळवाड म्हाळसा संस्था ता. चाळीसगाव), आमदार किशोर धनसिंग पाटील (विजय संस्था, अंतुर्ली खुर्द ता. पाचोरा), आमदार अनिल भाईदास पाटील (गुरूदत्त संस्था, खवशी ता. अमळनेर), आमदार चिमणराव रूपचंद पाटील (देवगाव संस्था, देवगाव ता.पारोळा) येथून मतदार आहेत.

या शिवाय इतर दिग्गज असे महापौर जयश्री सुनील महाजन (किसान संस्था, असोदा ता. जळगाव), छाया गुलाबराव देवकर (श्रीकृष्ण संस्था शिरसोली ता.जळगाव), रवींद्रभय्या पाटील (मनूर संस्था, ता. बोदवड), रोहिणी एकनाथ खडसे (वल्लभभाई संस्था, घाणखेड ता.बोदवड), पराग वसंत मोरे (उदय संस्था जोगलखेडे ता. पारोळा), वसंतराव जीवनराव मोरे (आडगाव संस्था ता. पारोळा), डॉ. सतीश भास्कर पाटील (तुळजाई संस्था, पारोळा), संजय मुरलीधर पवार (तुळजाई संस्था, भोद ता. धरणगाव), सोनल संजय पवार (गायत्री संस्था, साळवा ता. धरणगाव), वाल्मीक विक्रम पाटील (लोहटार संस्था ता. पाचोरा), जयश्री अनिल पाटील (भाग्यलक्ष्मी संस्था ता. अमळनेर), दिलीप ओंकार वाघ (श्रीकृष्ण संस्था राणीचे बांबरूड, ता. पाचोरा), स्मिता उदय वाघ (उंधाटी संस्था ता. अमळनेर), भागचंद मोतीलाल जैन (ओम साई संस्था, बामणे ता.एरंडोल).

गुलाबराव पाटलांचे सहकार क्षेत्रात पाऊल

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सहकार क्षेत्रात फारसे नव्हते. मात्र यावेळी जिल्हा सहकारी दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. मतदार यादीत त्याचे वडली दूध उत्पादक सहकारी संस्थेकडून नाव आले आहे. त्यामुळे ते आता सहकार क्षेत्रातही पाऊल टाकण्याची शक्यता दिसत असून जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून ते श्रीगणेशा करण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT