District Milk Union esakal
जळगाव

District Milk Union Election : महाविकास आघाडी विरुद्ध भाजप -शिंदेगट युती लढणार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी दहा डिसेंबरला मतदान होणार आहे. अर्ज भरण्यास उद्या (ता.३) पासून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व कॉंग्रेसची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप -शिवसेना शिंदेगट युती अशी लढत होण्याचे संकेत आहेत. एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी आज (ता.१) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली त्यात इच्छुकांनी अर्ज घ्यावे, असे ठरल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी जाहीर केला. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी ३ ते १० नोव्हेंबरपर्यंत सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे.(District Milk Union ElectionBJP Shinde Group Will fight against Maha Vikas Aghadi Jalgaon News)

वैध उमेदवारांची यादी १४ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येईल. १४ ते २८ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. तसेच अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. उमेदवारांना चिन्ह वाटप २९ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. १० डिसेंबर रोजी सकाळ ८ ते ४ यावेळेत मतदान होईल. ११ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.

भाजप-शिवसेना शिंदे गट युती

जिल्हा दूध संघ निवडणुकीत प्रथमच भाजप -शिवसेना शिंदे गट युती एकत्र मैदानात उतरणार आहे. भाजपचे नेते राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व शिवसेना शिंदे गटाचे नेते राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे या गटाचे नेतृत्व करणार आहेत. भाजपतर्फे पक्ष कार्यालयात नुकतीच दूध संघाच्या निवडणुकीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, अरविंद देशमुख आदी उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

महाविकास आघाडी लढणार

राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व काँग्रेस अशी महाविकास आघाडी मैदानात उतरणार असल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील मुक्ताईनगरातील निवासस्थानी बैठक घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, डॉ. संजीव पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, चाळीसगाव येथील प्रमोद पाटील आदी उपस्थित होते. एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वात लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घ्यावेत, असेही सांगण्यात आले.

"जिल्हा दूध संघ निवडणुकीनिमित्ताने आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची आमदार एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना ठाकरे गट अशी महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

ॲड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

"भाजप व शिवसेना शिंदे गट युतीतर्फे निवडणूक लढविण्यात येणार आहे. पक्षाचे नेते राज्याचे मंत्री गिरीश महाजन व शिंदे गटाचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात येणार आहे."

आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष, भाजप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT