Jalgaon Leaders of various parties gathered to scrutinize the election applications of District Milk Sangh esakal
जळगाव

District Milk Union : चव्हाणांच्या अर्जावर मंदाकिनी खडसेंची हरकत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अर्ज छाननीत शुक्रवारी (ता. ११) हरकती प्राप्त झाल्या आहेत. आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्जावर मंदाकिनी खडसे यांनी, तर राष्ट्रवादीचे वाल्मीक पाटील, राष्ट्रवादीचेच संजय पवार यांनी एकमेकांच्या अर्जावर हरकत घेतली.

जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी १८२ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्या अर्जांची शुक्रवारी छाननी झाली. छाननीत सर्व अर्ज वैध ठरले. मात्र, १८ जणांच्या उमेदवारी अर्जांवर हरकती घेण्यात आल्या. त्यात मंदाकिनी खडसे यांनी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या मुक्ताईनगर तालुक्यात दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली.

सहकार कायद्याप्रमाणे एका तालुक्यातील उमेदवार दुसऱ्या तालुक्यातील मतदारसंघात अर्ज दाखल करू शकत नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्याची त्यांनी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे वाल्मीक पाटील यांच्या धरणगाव तालुक्यातून दाखल केलेल्या अर्जावर हरकत घेतली आहे. (District Milk Union Mandakini Khadse objected to Chavan application Hearing tomorrow on 18 objection NCP objection Jalgaon News)

ते पाचोरा तालुक्यात सभासद असताना, धरणगाव तालुक्यातून अर्ज दाखल करू शकत नाही, असा त्यांनी दावा केला. वाल्मीक पाटील यांनीही संजय पवार यांच्या अर्जावर हरकत घेतली. एक सभासद दोन तालुक्यांतून ठराव करू शकत नाही. श्री. पवार यांचे दोन तालुक्यांतून ठराव असून, त्यांचे नाव दोन तालुक्यांच्या मतदारयादीत आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच चोपडा तालुक्यातून दाखल रोहित निकम यांच्या अर्जावर इंदिरा पाटील यांनी हरकत घेतली. भुसावळ तालुक्यातील मतदारसंघातील उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या उमेदवारीवरही हरकत घेण्यात आली.

हरकतींवर रविवारी निर्णय

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत १८ उमेदवारी अर्जांवर घेतलेल्या हरकतींवर निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई रविवारी (ता. १३) सुनावणी घेणार आहेत. याबाबत त्यांनी सांगितले, की सर्व १८ हरकतींवर आपण रविवारी सुनावणी घेऊन निकाल देणार आहोत. आपल्या निकालावर नाशिक विभागीय सहनिबंधक आयुक्तांकडे बुधवार (ता. १६)पर्यंत अपिल दाखल करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT