Dyaneshwar Jalkekar Maharaj esakal
जळगाव

Jalgaon News : महायुतीत चुकीच्या वक्तव्याने वातावरण दूषित करू नका! : जिल्हाध्यक्ष जळकेकर

महायुतीत असलेल्या पक्षांना जागांवर दावा करण्याचा हक्क आहे, परंतु त्यांनी तो आपल्या पक्षाच्या नेत्याकडे करावा उगाच त्याची जाहीर वाच्यता करू नये.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महायुतीत असलेल्या पक्षांना जागांवर दावा करण्याचा हक्क आहे, परंतु त्यांनी तो आपल्या पक्षाच्या नेत्याकडे करावा उगाच त्याची जाहीर वाच्यता करू नये. महायुतीत असलेल्या नेत्यांचे संबंध चांगले आहेत.

उमेदवारीबाबत दोन्ही पक्षाचे कोअर कमिटीचे सदस्य निर्णय घेतील.(District President Jalkekar statement of Dont contaminate environment with wrong statements in Mahayuti jalgaon news )

त्यामुळे चुकीचे वक्तव्य करून उगीच वातावरण दूषित करू नये, असा सल्ला भाजपचे जळगाव क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जळकेकर महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांना दिला आहे. जळगाव लोकसभा भाजप नव्हे तर शिवसेना शिंदे गटच लढणार, सर्व्हेत भाजप उमेदवार पिछाडीवर असल्याचा दावा नीलेश पाटील यांनी केला होता.

त्यावर बोलताना जळकेकर महाराज म्हणाले, महायुतीतील पक्षांनी दावा करण्यास आपलीच काहीच हरकत नाही. परंतु सर्व्हेत भाजप पिछाडीवर आहे, असे म्हणणे साफ चुकीचे आहे. कोणी सर्व्हे केला, त्याची संपूर्ण माहितीच त्यांनी द्यावी असे आव्हानही त्यांनी पाटलांना दिले आहे.

परंपरेनुसार भाजपचा गड

जळगाव लोकसभेच्या दाव्याबाबत सांगावयाचे झाल्यास ही जागा परंपरागत भारतीय जनता पक्षाची आहे, आणि पक्षाची ताकद किती आहे, हे चित्र तर समोरच दिसून येत आहे. ते ज्या पारोळा, पाचोरा मतदारसंघाचा दावा करीत आहेत, त्या मतदारसंघातून आमचे खासदार तब्बल ७० ते ७५हजार मताधिक्याने निवडून आले आहेत.

त्यांच्याकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील असल्याचा दावा ते करीत आहे. परंतु, आमच्याकडे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासारखे भक्कम नेतृत्व आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात आमचे दोन आमदार आहेत. पंचायत समिती नव्हे तर जिल्हा परिषदेवरच आमचा अध्यक्ष होता. एरंडोल, पारोळा, चाळीसगाव पालिकेवर अध्यक्ष भाजपचा होता.त्यामुळे ताकदीचा दावा त्यांनी करू नये.

कोअर कमिटी निर्णय घेईल

भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाशिवाय आम्ही बोलत नाही. त्यामुळे आम्ही उगाच अशा वादात बोलत नाही, असे मत व्यक्त करून ते म्हणाले, महायुतीत असलेल्या तीनही पक्षांच्या नेत्यांचे संबंध चांगले आहेत. त्याची प्रचिती नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात नुकतीच आलेली आहेत. लोकसभेच्या उमेदवारीबाबत भाजपच्या कोअर कमिटीतील नेते तसेच शिवसेना शिंदे गटाच्या कोअर कमिटीतील नेते निर्णय घेतील.

वातावरण दूषित करू नये

पक्षाची असलेली ताकद आपल्या पक्षाच्या नेत्यांना सांगण्याचा प्रत्येकाला हक्क आहे, त्यामुळे आपल्या पक्षाची लोकसभा क्षेत्रात काय ताकद आहे हे त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना जरूर सांगावे परंतु, त्याबाबत जाहीर वाच्यता करू नये, त्यामुळे महायुतीत जिल्ह्यात असलेले वातावरण उगीचच दूषित होते. तसे त्यांनी करू नये, असा सल्लाही ज्ञानेश्‍वर जळकेकर महाराजांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : तुम्ही मला निवडलं, अजित पवारांना निवडलं आता युगेंद्र पवारला निवडून द्या - शरद पवार

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT