While guiding during meeting of Class 10th 12th Center Directors Divisional Secretary M. S. desale  esakal
जळगाव

HSC SSC Exam 2024 : कॉपी करतांना पकडल्यास नवीन उत्तरपत्रिका : विभागीय सचिव एम. एस. देसले

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या कॉपीमुक्त होण्यासाठी केंद्र संचालकांनी प्रयत्न करावे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या कॉपीमुक्त होण्यासाठी केंद्र संचालकांनी प्रयत्न करावे. तसेच कॉपीमुक्त परिक्षेत कॉपी करतांना विद्यार्थी पकडल्यास त्याला दुसरी उत्तरपत्रिका देउन पेपर सोडवायला लावावा.

अशा सुचना नाशिक विभागीय एस.एस.सी. आणि एच.एस.सी. बोर्डाचे सचिव एम. एस. देसले यांनी केंद्र संचालकाच्या बैठकीत दिल्या. (Divisional Secretary M. S. desale statement New Answer Sheet if Caught Copying jalgaon news)

येथील जी.एच.रायसोनी इंजिनिअरींग कालेजमध्ये आज झालेल्या केंद्र संचालकांच्या बैठकीला सोनल तिवारी, उपशिक्षणाधिकारी एफ. ए. पठाण, रागिणी चव्हाण, तालुका अध्यक्ष एस. एम. खंबायत विभागीय बोर्डाचे आर.बी. गोसावी, संजय बोरसे, शशिकांत चौधरी व जळगाव जिल्ह्यातील दहावी व बारावी परीक्षा केंद्र संचालक उपस्थित होते.

श्री.देसले म्हणाले, तणाव मुक्त अशा वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाता यावे यासाठी परीक्षक, केंद्र संचालकांनी प्रयत्न करावेत. विद्यार्थी हा परीक्षेला सामोरे जाताना आनंदी आणि प्रसन्न वातावरणात असला पाहिजे.

त्या सोबतच परीक्षा घेणारी यंत्रणादेखील तणावमुक्त असणे आवश्यक आहे. नियमावलीच्या अनुसार आपण कार्यतत्पर राहत कर्तव्य पूर्ती करावी. विद्यार्थ्यांच्या एकूणच विकासाला चालना द्यावी.

परीक्षेत विद्यार्थ्यांकडून गैरमार्गाचा अवलंब होणार नाही. यची काळजी घ्यावी. बोर्डाचे सहसचिव एम. व्ही. कदम यांनी परीक्षेतील अडचणी व केंद्र संचालक परीक्षकांच्या कामाची माहिती दिली. केंद्र संचालकांच्या वतीने डॉ. मिलिंद बागुल यांनी परीक्षेच्या अडचणी मांडल्या.

अनिल सोनार यांनी सूत्रसंचालन केले. एस. एम. खंबायत यांनी आभार मानले. डॉ.प्रीती अग्रवाल यांनी स्वागत केले. संदीप पाटील, मिनाक्षी पाटील उपस्थित होते.

बैठकीतील ठळक मुद्दे..

* परिक्षार्थींना साडे दहाला परिक्षा केंद्रात घ्यावे.

* योग्य कारण असल्यास अकरापर्यंत परिक्षेला बसू द्या

* परिक्षा केंद्राच्या मुख्य गेटला कुलूप लावू नका

* कॉपी करताना पकडल्यास दुसरी उत्तर पत्रिका देउन पेपर लिहायला सांगा

पाणी पुरविणारा बंद

परिक्षे दरम्यान पाणी वाटप करणारा मुलगाच कॉपी पुरवितो. यामुळे यंदापासून बोर्डाने पाणी वाटप करणाऱ्यांना बंदी करीत परिक्षा केंद्रातच परिक्षार्थींसाठी पाण्याची सोय करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT