thief esakal
जळगाव

Diwali Precaution : आली दिवाळी.. सांभाळा घरदार! सुट्यांमध्ये बाहेर जाताना घ्या काळजी

सकाळ वृत्तसेवा

Diwali Precaution : गेल्या आठवड्यात दसरा आटोपल्यावर दिवाळीची चाहूल लागली. महाविद्यालयीन तरुण-तरुणी, पालक पर्यटनाचा, तर शाळकरी मुलांचे पालकांनी मामाच्या गावी जाण्याचा बेत आखण्यास सुरुवात केली.

सरकारी नोकर, दुकानदार दिवाळीचे पाच ते सहा दिवस सुट्यांचा आनंद घेत असल्याने या काळात घरे बंद करून बाहेर गावी जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. वर्षभरापेक्षा सर्वाधिक चोरी-घरफोडी आणि दरोड्याचे गुन्हे दिवाळीच्या सुट्यांमध्ये घडतात. काही दिवसांवर सण येऊन ठेपला असून दिवाळीपूर्वी टेहळणी करण्यासाठी चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. (diwali festival precautions jalgaon news)

वसूबारसपासून ते भाऊबिजेपर्यंत सलग दिवाळी साजरी होईल. याच काळात नोकरदार, कामगारांना सलग सुट्या मिळतात. विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा आटोपल्याने दिवाळीच्या सुट्यांचा काळ असल्याने पालक मुलांसह पर्यटनाप्रमाणे नातेवाइकांकडे जाण्याचा बेत आखतात. जळगावसह खानदेशात मोठ्याप्रमाणावर इतर जिल्ह्यातील नोकरदार, कामगार वर्ग आहे.

साडेपाच लाख लोकसंख्येच्या जळगाव शहरात सरकारी, खासगी नोकरदार, कामगार आणि मजूर, दुकानदार, व्यावसायिक, कारखानदार दिवाळी साजरा करत असल्याने नियोजनाप्रमाणे सुट्ट्य़ांचा काळ ठरलेला असतो. चोरट्यांकडून ही संधी हेरुन चोऱ्यांचे नियोजन केले जाते. त्यामुळे स्वतःच्या मालमत्तांची काळजी घेण्याची जबाबदारी अगोदर स्वतःची असून घर-कारखाना, दुकाने बंद करून जाताना विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे.

थंडीचा जोर चोरट्यांच्या पथ्थ्यावर

दिवाळीत पारा घसरून गुलाबी थंडी आता जाणवू लागली. थंडी वाढताच रात्री दहानंतर कॉलनी, नागरी वस्त्या आणि अपार्टमेंट निर्मनुष्य होतात. शेजारी काय घडतय हे देखील घरात बसून कळत नसल्याने चोरट्यांचे काम सोपे होत एकाच रात्रीतून ५ ते ६ घरात घरफोड्या करून चोरटे पोबारा करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी चोरी झाल्याची बोंब उठते. मात्र तोपर्यंत वेळ गेलेली असते.

पोलिसांची गस्त ढेपाळली

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि त्यासोबत आंदोलने, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे आदींचा बंदोबस्त करून पोलीस कंटाळून गेले आहेत. अशात दिवाळीच्या तयारीमुळे यंत्रणा मरगळलेली असते. त्यात रात्रीची गस्त कशा पद्धतीने होते, वर चोऱ्या आणि घरफोडीच्या गुन्ह्यांची संख्या ठरते. सध्या पोलिसांची गस्त ढेपाळलेल्या अवस्थेत आहे. रात्री कधीतरी दोन ते अडीचच्या सुमारास एखाद्या पोलीस ठाण्याचे वाहन ‘सायरन' वाजवून निघून जाते. पोलीस गाडी येण्याची वेळ चोरट्यांना हेरुन ठेवलेली असल्याने घरफोडी करत ते पोबारा करतात.

घ्यावयाची काळजी

० अपार्टमेंट-सोसायटीत ‘नाईट व्हिजन' कॅमेरे कार्यान्वित करावेत

० घराबाहेर रात्री पुरेशा उजेडाची सोय करावी. दिवे रात्री सुरू ठेवावेत

० चार ते दोन कुटुंब बाहेरगावी जात असल्यास वॉचमन ठेवावा

० वॉचमनजवळ शिट्टी आणि काठी द्यावी. त्याचा वापर करण्यास सांगावे

० जवळच्या पोलीस ठाण्याचा संपर्क क्रमांक वॉचमनसाठी भिंतीवर लिहावा

० घराच्या मुख्य दाराच्या कड्यांची मजबुती तपासून घ्यावी

० लोखंडी ग्रीलचे ‘सेफ्टी डोअर' असले तरी त्याला वायर लॉक लावावे

० बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना माहिती द्यावी.

० घरातील रोख रक्कम, दागिने लॉकरमध्ये ठेवावेत

"शहरातील सर्व अट्टल गुन्हेगार, ‘रेकॉर्ड'वरील चोरटे पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यात आहेत. बहुतांश हद्दपार करण्यात आले आहेत. आगामी सुट्यांच्या काळात पोलीस गस्त वाढवण्यात येणार आहेत. नागरिकांनी बाहेरगावी जाताना विशेष काळजी घेत रोकड, दागिने बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावेत. पोलीस नियंत्रण कक्षात २४ तासासाठी ११२ हा क्रमांक उपलब्ध असून अप्रिय घटनाप्रसंगी पोलीस आपल्या मदतीला तत्परतेने हजर आहेत." - संदीप गावीत (उपविभागीय पोलीस अधिकारी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT